डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चिंचोली येथे साजरी.
शिराळा - प्रतिनिधी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती चिंचोली ता. शिराळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ग्रामपंचायत चिंचोली व भीमशक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मा. योगेश नाईक ग्रामविकास अधिकारी चिंचोली यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तींचे पुजन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.सुरेश जाधव हे होते. कथाकार मा.सुनिल सकटे याचीही उपस्थिती होती. मी महात्मा जोतिराव फुले बोलतोय या एकपात्री प्रयोग निर्माते आयु.प्रदिप बनसोडे यांनी सविस्तर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन अशोक घोलप यांनी केले तर आभार अनिल सकटे यांनी मानले.
Comments
Post a Comment