कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव, महाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव, महाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव, ता. कराड या महाविद्यालयाध्ये सन २०२४-२५ महाविद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांच्या निकालात उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक धोरण सांगून विद्यार्थ्यांना पुढे येणाऱ्या परीक्षाबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी व आभार प्रा. मोनिका शिंदे यांनी मानले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments
Post a Comment