प्रवीण साळुंखे यांची भाजपा कराड दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्षपदी निवड.

 

'आमदार डॉ.अतुलबाबांनी तरूण व निष्ठावंत कार्यकर्ताची ग्रामीण भागातून केली निवड'.

प्रवीण साळुंखे यांची भाजपा कराड दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्षपदी निवड.


उंडाळे -प्रतिनिधी.

भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा मंडल अध्यक्ष पदाच्या निवडी संपन्न  झाल्या. भा ज पा कडून पक्षाची मोर्चेबांधणी मजबूत करण्यासाठी बूथ अध्यक्ष महत्वाचे असतात, त्याचबरोबर  मंडल अध्यक्ष यांचीही महत्त्वाची भूमिका असते.संपूर्ण राज्यभर मंडल अध्यक्षांची निवडी करण्यात आल्या. सातारा जिल्ह्यात  कराड दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्षपदी मा.प्रवीण शांताराम साळुंखे यांची निवड करण्यात आली. 

तरूण व निष्ठावंत कार्यकर्ताची ग्रामीण भागातून कराड  दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ.अतुलबाबांनी निवड केलेबद्दल जनतेतून या निवडीबद्दल कौतुक होतंय. या मंडल अध्यक्ष निवडीतून कराड दक्षिण मतदारसंघात सामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवून आमदार आपली विचारधारा रूजवतील असा संकेत  दिसतोय. या निवडीबद्दल मा.प्रवीण साळुंखे यांच अभिनंदन केलं जातंय. यात जेष्ठ मार्गदर्शक मा.प्रकाश पाटील (माजी चेअरमन वि.का.से.सो.साळशिरंबे.),प्रा.विनोद कांबळे (संपादक,गोंडवाना न्यूज). ,मा.धनाजी साठे,मा.प्रवीण चोपडे, मा.गौरव चोपडे,(पत्रकार, गोंडवाना न्यूज) पै. अमोल पाटील (दादा), मा. वसंत मोहीते.(मा.उपसरपंच, साळशिरंबे) संजय शेवाळे. सवादे, अक्षय शेटे. येळगाव, बाळकृष्ण माने.( संरपच महारुगडेवाडी.)अजित महारूगडे.( उपसरपंच महारुगडेवाडी.) योगेश‌ पाटील. नांदगाव, राजेद्र देशमुख. नारायणवाडी, निलेश शेडगे, गोठेवाडी,सचिन बागट, येणपे.यांनी मा. प्रवीण साळुंखे यांचे  निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



 "कराड दक्षिणेच्या विकासाचे आश्वासक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. कराड दक्षिण मधील माझ्या कार्यक्षेत्रात मी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करेन."

____ श्री. प्रवीण शांताराम साळुंखे. 
       (मंडल अध्यक्ष, कराड दक्षिण पश्चिम.)

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .