कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.


उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे सुधाकर देसाई यांचे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

देसाई यांनी तंबाखू सेवनामुळे मानसिक ताण वाढतो, चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक विकारांचे प्रमाण वाढू शकते तसेच कॅन्सर, हृदयविकार, श्वसनाच्या समस्या, त्वचारोग अशा अनेक समस्याने आपण ग्रासले जातो त्यामुळे अशा व्यसनापासून आपण दूर राहिले पाहिजे असे सांगितले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट  यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .