कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात महिला सक्षमीकरणावर व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात महिला सक्षमीकरणावर व्याख्यान संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे रुदाली सरमालकर यांचे महिला सक्षमीकरण या विषयावरती विद्यार्थिनींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
त्या सध्या वी आर मोअर सोलुशन लिमिटेड येथे गोल्ड डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यावेळी विद्यार्थिनींना आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, योग्य आहार कसा घेतला पाहिजे, तणावमुक्त कसे राहावे त्याचबरोबर मासिक पाळीत होणारा त्रास व घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील तसेच श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील, वी आर मोअर सोलुशन लिमिटेडच्या सिल्वर डायरेक्टर अनघा सोरप, स्मिता धुमाळ, राहुल डिस्ट्रीब्यूटर व अन्वी सॉफ्टड्रिंक्सचे मालक अभिजीत पाटील उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी प्रमुख उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. तेजस्वी कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमावेळी सर्व महिला प्राध्यापक वर्ग व विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment