सह्याद्री कारखाना निवडणुकीत 'पी. डी. पाटील पॅनलला सभासदांनी दिले स्पष्ट बहुमत.

 सह्याद्री साखर  कारखाना निवडणुकीत पी. डी. पाटील पॅनलला स्पष्ट बहुमत. 


कराड - प्रतिनिधी. 

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'पी. डी. पाटील पॅनल'ने मोठा विजय मिळवत विरोधकांना आसमान दाखवले. दोन्ही फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर  तब्बल 8000 मतांच्या आघाडीने विजयी संपादन केला.

या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सरासरी 7500 मते मिळाली, तर पी. डी. पाटील पॅनलने सरासरी 15500मते मिळवून स्पष्ट बहुमत सिद्ध करत आपली ताकद दाखवून दिली. निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि भाजप युवा मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलला केवळ 2250 मते मिळाली आहेत.

ही निवडणूक परिसरात चांगलीच लक्षवेधी ठरली होती. राजकीय दृष्ट्या बहूचर्चित असलेल्या निवडणुकीत पी. डी. पाटील पॅनलचा बहुमताने विजय झाला या निकालाने सह्याद्रीत पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व मान्य केले आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .