Posts

Image
महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण साधेपणाने ; फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात होणार कार्यक्रम सातारा दि. 29 ( जि. मा. का ) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम केवळ जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय येथेच सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली आहे. या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. इतर मान्यवरांना या कार्यक्रमास आमंत्रित करण्यात येणार नाही तसेच कवायतीचे आयोजन करण्यात येणार नाही, अशीही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली.

कोरोनामुळे भारतीय समाजावर परिणाम कोणते होतील ?

Image
कोरोनामुळे भारतीय  समाजावर  परिणाम कोणते होतील ?   समग्र साधन संपत्ती निर्देशांकामध्ये असलेल्या स्थानाचा भारताला फायदा होईल का ? साळशिरंबे- प्रतिनिधी (प्रा.डॉ. विनोद कांबळे ) कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे भारताची त्याचबरोबर जगाची अर्थव्यवस्था ढासळलेली दिसते त्यामुळे या परिस्थितीत भारतीय समाजावर कोणता परिणाम  होईल ?भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ? याबद्दल आत्तापासूनच समीक्षा करणे आणि त्यावरील उपाय योजने गरजेचे आहे.  कारण भारत हा समग्र साधन संपत्ती निर्देशांकांमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये असलेला दिसून येतो (IWI REPORT 2012)आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारा मनुष्य बळ या जमेच्या बाजूच्या जोरावर भविष्यात भारत हा जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवू शकतो .  नुकत्याच या संघटनेने UNCTAD(United Nations Conference on Trade & Development ) जाहीर केलेल्या अहवालात भारताला  कोरोनामुळे अर्थव्यवस्थेमध्ये तोटा होईल या पद्धतीचं अनुमान काढलेला दिसून येत.         हा  अहवाल  आपण  नाकारला व आपल्या उपलब्ध साधनसंपत्त...
Image
गावपातळीवरील कृती समितीकडून वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत कर्मचाऱ्यांना  सहकार्य करण्याचे  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन. सातारा दि. 25 (जिमाका) : राज्यात कोविड-19 या विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये या करिता ग्रामीण भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ग्रामपातळीवर राबविण्याची व पार पाडावयाची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.  ग्रामणी भागामध्ये काम करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी अथवा वैद्यकिय क्षेत्राशी निगडित  काम करणारे सर्व कर्मचारी यांची त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणापासून कर्तव्याच्या ठिकाणी  जाणे-येणे होत आहे. अशा सेवक-सेविकांना गावामध्ये प्रवेश नाकारत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर गठीत गाव समिती, ग्रामस्थ यांनी कोणत्याही प्राकारचा अडथळा करु नये, उलट कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वैद्यकिय क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अत्यावश्यक बाबींकरीता पुरेसा वेळ देता येत नसल्याने, त्यांच्या द...
Image
निकट सहवासित 43 वर्षीय महिला कोरोना बाधित ; मृत 5 महिन्याच्या बालकासह 55 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह  13 वर्षाच्या मुलाचा अहवाल अनिर्णित तर 10 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल. सातारा दि. 23( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 43 वर्षीय महिलेचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने  ही 43 वर्षीय महिला कोरोना बाधित असलयाची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 14  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.   क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 4, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 8 व फलटण येथील 11 असे एकूण 55 रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे मृत झालेल्या 5 महिन्याच्या बालकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचेही कळविण्यात आले आहे. त...
Image
नांदगाव पोलीस ठाण्याच्या वतीने विभागात कोरोनासंदर्भात जनजागृती रॅली. "संचारबंदी व कोरोना संदर्भात जनजागृती रॅलीला नागरिकांच्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद "            ' गावागावांमध्ये रॅलीचे जोरदार स्वागत  ' ऊंडाळे - प्रतिनिधी (प्रदीप पाटील ) नांदगाव औट पोस्ट च्या वतीने जनजागृती अभियान. गावोगावी रांगोळी काढुन केले स्वागत. कोरोनो चा वाढता प्रसार रोखण्यासाठी कराड तालुका पोलीसांनी कंबर कसली आहे या मध्ये पोलीस अधीक्षक सुरज गुरव  व कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव औट पोस्ट व या अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील यांच्या सहकार्याने  नांदगाव औट पोस्ट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव डांगे यांच्या माध्यमातून जनजागृती व सोशल डिस्टन्स सिंग  अभियान राबविण्यात आले. या परिसरातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव,  मनव, कालवडे, बेलवडे सह तब्बल सोळा गावात जनजागृती करण्यात आली तर मनव आणि नांदगाव येथे पोलीसांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे महिलांनी औक्षण देखील केले. जनजागृती मुळे संचारब...
Image
ऊंडाळे सह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. " जोरदार गारपिटीसह वादळी पाऊस "  उंडाळे- प्रतिनिधी (प्रदीप पाटील ) ऊंडाळे सह कराड दक्षिण मधील डोंगरी भागात येवती, पाटीलवाडी, येळगाव महासोली, सवादे परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसाने अक्षरशः दोन तास झोडपून काढले, उंडाळे परिसरात  शिवारात असणारी झाडे उखडुन पडली. अवकाळी पाऊसामुळे उंडाळे व परिसरातील  शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे  आहे,  सद्या या भागात मशागतीचे कामे सुरू आहेत नांगरणी करणे, शेणखत टाकणे, अशी कामे सुरू आहेत अशातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात चैतन्य निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून कोरोनो सारख्या महाभयंकर विषाणू ने अख्या जगाला वेठीस धरले आहे त्याचाच परिणाम राज्यात देखील आहे  गेल्या काही दिवसांपासून उंडाळे परिसरात देखील याचा परिणाम दिसला. या सर्व संकटांचा सामना करत जगाचा पोशिंदा मात्र आपल्या शेतीचे कामे करण्यात मग्न आहेत या पडलेल्या पावसामुळे मात्र एक प्रकारे शेतकऱ्यांना उर्जाच मिळाली आहे.परिसरात सर्वत्र शेती कामांना यापुढे वेग येईल.
Image
कराड तालुक्यातील कोरोनाग्रस्त तरुण उपचारानंतर कोरोना मुक्त. " कराड मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये होते उपचार सुरू" कराड -(प्रतिनिधी )   कराड तालुक्यातील ३५वर्षीय युवकाला कोरोनाचा  संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते उपचारानंतर त्याचे कोरोना रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्यामुळे त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले.