कोरोनामुळे भारतीय समाजावर परिणाम कोणते होतील ?

कोरोनामुळे भारतीय  समाजावर  परिणाम कोणते होतील ?

 समग्र साधन संपत्ती निर्देशांकामध्ये असलेल्या स्थानाचा भारताला फायदा होईल का ?


साळशिरंबे- प्रतिनिधी (प्रा.डॉ. विनोद कांबळे )
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे भारताची त्याचबरोबर जगाची अर्थव्यवस्था ढासळलेली दिसते त्यामुळे या परिस्थितीत भारतीय समाजावर कोणता परिणाम  होईल ?भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ? याबद्दल आत्तापासूनच समीक्षा करणे आणि त्यावरील उपाय योजने गरजेचे आहे.  कारण भारत हा समग्र साधन संपत्ती निर्देशांकांमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये असलेला दिसून येतो (IWI REPORT 2012)आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारा मनुष्य बळ या जमेच्या बाजूच्या जोरावर भविष्यात भारत हा जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवू शकतो .
 नुकत्याच या संघटनेने UNCTAD(United Nations Conference on Trade & Development ) जाहीर केलेल्या अहवालात भारताला  कोरोनामुळे अर्थव्यवस्थेमध्ये तोटा होईल या पद्धतीचं अनुमान काढलेला दिसून येत.
        हा  अहवाल  आपण  नाकारला व आपल्या उपलब्ध साधनसंपत्तीच्या जोरावर  योग्य नियोजनानुसार उपलब्ध साधन संपत्तीवर आधारित उद्योगधंद्यांची निर्मिती करून जास्तीत जास्त स्थानिक बाजारपेठ निर्माण केली त्या वस्तूंना स्थानिक खप वाढला या पद्धतीचं नियोजन भविष्यात जर स्थानिक प्रशासनांना काटेकोरपणे राबवला तर भारत कोरोना सारख्या समस्येतून ढासळती अर्थव्यवस्था सावरायला भक्कम आहे असे दिसते.
पण अर्थव्यवस्थाही  विषम स्वरूपात आहे.  सध्या सर्वसाधारण  विचार केला  तर काही लोक हे इतर लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या लोकांना जेवण घालतात . त्यांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी कुठलीही स्वतःची वाहतूक व्यवस्था दिसून येत नाही ते पायी प्रवास करतात . म्हणजे एकीकडे भारतामध्ये राहणारा संविधानाने त्याला समान अधिकार दिलेला समुदाय रोजच्या रोजीरोटीसाठी हतबल आहे. तर दुसरी कडे अमाप संपत्ती असणारी धनिक मंडळी आहे .  या लॉक डाऊनच्या काळात सरकारी पुस्तकात असलेल्या आकडेवारींची सत्यतेची  प्रचिती आली  दरडोई उत्पन्नाचा वाटा असणारी जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार प्रत्येकाला दोन वेळचं अन्न मिळण्यासाठी कोणतीही अडचण नाही . पण सध्याचे वास्तव तसं नाही हे नक्की . आज ग्रामीण भागात ठराविक समुदायांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. म्हणजेच त्यांच्या भविष्याच्या निर्वाहासाठी  सोडाच पण वर्तमान निर्वाहासाठी देखील कोणतेही ठोस साधन नाही. अल्प जमीन बहुतेक जन भूमिहीन  गुंतवण्यासाठी भांडवल नाही .म्हणून ती पडून  दुसरीकडे बक्कळ जमिनी त्यांच्या शेतामध्ये राबणारा शेतमजूर यांची व्यथा ही निराळीच आहे.
        सरकारच्या स्वस्त धान्य दुकानात देखील ऑनलाइन RC  नंबरवर  त्यांच्या रेशन कार्ड नंबरवर दिसणार धान्य देखील त्याला मिळत नाही. त्यांना भीतीपोटी आपल्या घरातील मृत व्यक्तींचा दाखला नेऊन त्याठिकाणी जमा केला होता.तरी देखील त्यांची नावे कमी न करता त्यांचे धान्य लाटण्याचा प्रकार सर्रास दिसून येत आहे.
   उच्च नीचतेच्या भेदभावामुळे भारतीय एकात्मतेला धोका पोहचत आहे. यामुळे समग्र मानवी विकासामध्ये अडचणी निर्माण होताहेत. जर प्रत्येक भारतीय नागरिकाने मनातील सर्व भेदभाव मिटवून कार्य केले तर राष्ट्राच्या विकासाबरोबरच भारतातील सामाजिक विकासही साधता येईल .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .