साळशिरंबे येथे स्वस्त धान्य लाभार्थी नागरिकांच्या घरपोच.
" ग्रामस्तरीय कमिटीकडून कार्यवाही ,सरपंच पोलीस पाटील, उपस्थित "
'कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ग्रामस्तरीय कमिटीकडून या पद्धतीचा अवलंब '
साळशिरंबे -(प्रतिनिधी)
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतभर केलेल्या उपाययोजनांमध्ये सोशल डिस्टन्ससिंग हा प्रतिबंधक उपाय केला जात आहे याचप्रमाणे साळशिरंबे गावातही स्वस्त धान्य दुकान वाटप केंद्राच्या मार्फत स्वस्त धान्य वाटप हे प्रत्येक लाभार्थीचा घरी जाऊन केलं जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकांना खबरदारी घेतलेली दिसून येते. प्रत्येक ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवून स्वस्त धान्य दुकान तसेच इतर आवश्यक वस्तूंचे वितरण केलेल आपल्याला दिसून आलं पण साळशिरंबे गावांमध्ये चक्क स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थींच्या घरपोच धान्य पोहोचवले .


Comments
Post a Comment