मॅग फायनान्स कंपनी ने जपली सामाजिक बांधिलकी.
" कोरोना या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध करण्यासाठी महिला बचत गटांना केले मास्कचे वाटप"
उंडाळे- प्रतिनिधी (प्रदीप पाटील )
सध्या पूर्ण जगाला कोरोनो सारख्या महाभयंकर विषाणू ने वेठीस धरले आहे त्याचा सामना करण्यासाठी आपल्या देशासह संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे कोरोनो ला रोखण्यासाठी दिवसरात्र आपले प्रशासन , वेगवेगळ्या सेवाभावी संस्था काम करत आहे असुन जगासमोर सध्या उभे ठाकलेल्या संकंटाचे रौद्र धारण केले त्या संकंटावर मात करण्याची आपली सामाजिक जबाबदारी असल्याची जाण ठेवत त्याच अनुषंगाने मॅग फायनान्स कंपनी ने सामाजिक बांधिलकी जपत येवती ता कराड महिला बचत गटांच्या काही महिलांना मास्क चे वाटप करण्यात आले आणि सोशल डिसटेनस चा वापर करून मास्क वाटप करण्यात आले या वेळी कंपनी चे प्रॉडक्ट मॅनेजर ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले कंपनीच्या संचालक मंडळाने नेहमीच सामाजिक कार्यास अग्रेसर राहुन काम केले आहे माणुस म्हणुन जन्माला आल्यावर आपणही समाजाला काही तरी देनं लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कंपनी ची यशस्वी घोडदौड सुरू आहे प्रत्येक व्यक्तीने घरीच रहावे आणि प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले...

Comments
Post a Comment