ग्रामीण भागात किराणा दुकानदाराकडुन , सर्वसामान्यांची लुट.
दुप्पट भावाने वस्तु विक्री: प्रशासनाकडुन कारवाईची गरज.
उंडाळे -प्रतिनीधी(प्रदिप पाटील)
जगभरात कोरोनाचे संकट असल्याने सार्वजनिक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा सुरु आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन वस्तूंची चढ्या भावाने विक्री सुरु आहे. कराड दक्षिण मधिल बहुतांश ग्रामीण भागात किराणा मालाची चढ्या दराने विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. बहुतांश किराणा दुकानात मूळ किंमतीपेक्षा अधिक दराने किराणा मालाची विक्री सुरु आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. खाद्य तेलाची किंमत ८२ रुपया पर्यंत असताना त्याची विक्री ९८-१०० रुपये प्रती किलोप्रमाणे होत असल्याचे दिसून आले. जवळपास २० टक्के अधिक दराने विक्री चालु असल्याचे दिसून येत आहे.‘लॉक डाऊन’ व महाराष्ट्र राज्यात संचारबंदी आहे. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे की जनतेने कसलीच परवा न करता घरात रहावे जेणेकरून त्यांची सुरक्षा होईल व संसारोपयोगी तसेच अत्यावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास कमी पडू देणार नाही व कसल्याच दुकानात गर्दी करून किंवा लाईन लाऊन सामान भरून भयभित होण्याची गरज नाही असे असताना कराड दक्षिणमधिल ग्रामीण भागातील व्यापारी या परिस्थितीचा फायदा घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जिवनावश्यक वस्तुमध्ये हे व्यापारी आपल्या मर्जीने दर लावत असून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य ाचे काही देणेघेणे नसल्यांचे चित्र पहावयास मिळत आहे. काहि किराणा दुकानदार डाळींचा दर किलो मागे 10 रूपयाने तर मसाल्याच्या पदार्थांचे दरही वाढविण्यात आले आहे. साबुदाणा, पोहे यातही दरवाढ झाली. सर्वच ठोक व्यापाऱ्यांनी दर वाढविल्याचे कारण किरकोळ विक्रेते सांगत आहे. मालाचा पुरवठा होत नाही असे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. मात्र जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीला परवानगी असतानाही केवळ कृत्रिम टंचाई दाखवत ही भाववाढ करण्यात आली आहे. यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेला सर्व सामान्य नागरिक आर्थिक कोंडीत सापडला आहे. नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी किराणा दुकाने 24 तास सुरू ठेवाण्याचा निर्देश सरकारने दिले आहेत.
विक्रेत्यांनी अचानक तेल, साखर, डाळी आदींचे दर वाढवून सर्वसामान्य नागरिकांची लुट चालविली आहे. इतर काही जणांनी भाजीपाला विक्री हे नफा मिळविण्यासाठी नवा उद्योग सुरू केला असून सर्व सामान्य शेतकऱ्यांकडून अल्पशाः दरात भाजीपाला घेऊन तो दुप्पट दराने विकला जात आहे. या प्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडुन व पोलीस प्रशासनाकडुन सर्वसामान्य ाची होणारी लुटीच्या विरोधात कडक पावले उचलण्यात येवुन संबंधित व्यापारी ,भाजी-पाला , किराणा दुकानदार विरोधात गुन्हे नोंद करुन त्यांचा परवाना कायम स्वरुपी बंद करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्याकडुन व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment