य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना करणार हॅन्ड सॅनिटायझर्सची निर्मिती. 

सातारा जिल्ह्यात  सॅनिटायझर निर्मिती करणारा कृष्णा  पहिला  कारखाना- डॉ. सुरेशबाबा भोसले.



कराड -(प्रतिनिधी)
कोरोना व्हायरसच्या रुपाने सबंध जगावर किंबहुना देशावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी
कराड तालुक्यातील रेठरे शिवनगर येथील य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याने नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून  हॅन्ड सॅनिटायझर्सची निर्मिती करण्याचे जाहिर केले .राजकिय ,सामाजिक ,सहकार ,क्षेञात दबदबा असणार्‍या कराड तालुक्यातील भोसले कुटूंबाच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा समुहाने नेहमी  सामाजिक बांधिलकी जपत अनेक वेगवेगळे क्रांतीकारक निर्णय घेतलेले आहेत. कारखान्यामध्ये निर्माण होणार्‍या हॅन्ड सॅनिटायझर्स सर्व प्रथम कारखान्याच्या सभासदांना घरपोच मोफत वाटप करण्यात येईल असे डाॅ. सुरेशबाबा भोसले यांनी सांगितले, कृष्णा कारखान्यामुळे सर्वसामांन्य शेतकर्‍यांचे जिवनमान उंचावले आहे. कारखान्याने शेतकर्‍यांच्या उसाला विक्रमी दर देण्यासोबत शेतकरी हिताचे निर्णय देखील घेतले आहे. कारखान्याचे कार्यक्षेञ सातारा,सांगली ,जिल्ह्यात असुन ४५ हजार सभासद असणार्‍या कारखान्याचे उत्तम असे नियोजन डाॅ.सुरेशबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
'ध्यास जनसेवेचा वारसा परंपरेचा ' या उक्तिप्रमाणे सहकार महर्षी स्व.जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन डाॅ.सुरेशबाबा भोसले ,डाॅ.अतुलबाबा भोसले ,विनायकबाबा  भोसले , हे  कार्यरत असुन शिक्षण ,वैधकीय ,सामाजिक, क्षेञात त्यांचे कार्य दिपस्तंभा सारखेच आहे, कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून भोसले कुटूंबाने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतल्याची उदाहरने आहेत. त्यापैकी गेल्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे कराड ,सांगली , कोल्हापूर तसेच कृष्णाकाठच्या गावांमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये पूरबाधीत नागरिकांना संसार उपयोगी साहित्य देऊन त्यांचे दु:ख पुसण्याचे कार्य करण्यामध्ये प्रामुख्याने भोसले  कुटूंब अग्रस्थानी होते. ज्याज्यावेळी नैसर्गीक आपत्तीचे संकट समाजावर येते त्या त्या वेळी हे कुटूंब समाजाच्या मदतीला निस्वार्थीपणे पुढे आल्याचे अनेकांनी पाहिले आहे. अंगणवाडी सेवेकांना मास्क वाटप , तसेच कृष्णा हाॅस्पिटल येथे कोरोणा बाधित रुग्णांसाठी ६० बेड्स त्याचबरोबर आयसोलेशन वाॅर्डची निर्मिती अवघ्या काही दिवसांमध्ये करण्यात आली.  प्रशस्त इमारत अनुभवी डाॅक्टरांची फौज डाॅ.सुरेबाबांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज आहे. 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .