नांदगाव पोलीस ठाण्याच्या वतीने विभागात कोरोनासंदर्भात जनजागृती रॅली.

"संचारबंदी व कोरोना संदर्भात जनजागृती रॅलीला नागरिकांच्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद "

           ' गावागावांमध्ये रॅलीचे जोरदार स्वागत  '


ऊंडाळे - प्रतिनिधी (प्रदीप पाटील )

नांदगाव औट पोस्ट च्या वतीने जनजागृती अभियान. गावोगावी रांगोळी काढुन केले स्वागत. कोरोनो चा वाढता प्रसार रोखण्यासाठी कराड तालुका पोलीसांनी कंबर कसली आहे या मध्ये पोलीस अधीक्षक सुरज गुरव  व कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव औट पोस्ट व या अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील यांच्या सहकार्याने  नांदगाव औट पोस्ट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव डांगे यांच्या माध्यमातून जनजागृती व सोशल डिस्टन्स सिंग  अभियान राबविण्यात आले. या परिसरातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव,  मनव, कालवडे, बेलवडे सह तब्बल सोळा गावात जनजागृती करण्यात आली तर मनव आणि नांदगाव येथे पोलीसांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे महिलांनी औक्षण देखील केले. जनजागृती मुळे संचारबंदी बाबत व कोरोनो विषयी घेण्याची खबरदारी या संबंधात ग्रामस्थांना माहिती देण्यात आली विभागातील पोलीस पाटील आणि नांदगाव पोलिसांनी संचारबंदी म्हनुन काय असते आणि त्याचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होते आदी विषयी माहिती देण्यात आली.पोलीस ठाण्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व नागरिकांच्या मधून कौतुक होत आहे.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .