सातारा जिल्ह्यासाठी अत्यावश्यक वाहतुकीला ऑनलाइन पास देण्याची सुविधा उपलब्ध.

" लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सुविधा करणाऱ्यांना वाहतूक पास मिळणार "

' नागरिकांच्यात असलेले वाहन परवाना विषयीचा संभ्रम दूर होणार'


साळशिरंबे - प्रा.(डॉ) विनोद कांबळे 
कोरोना वायरसला प्रतिबंधक उपाय म्हणून  भारतभर  लॉकडाउनचा निर्णय घेतला या निर्णयामध्ये फक्त आवश्यक सेवा सुविधा लोकांना उपलब्ध राहणार आहेत. या सेवा सुविधा पुरवणाऱ्या लोकांच्या वाहनांना परवाना देण्यासाठी आता सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे .
            covid 19.mpolice.in या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना अत्यावशक सेवा सुविधा पुरवणे वाहनांना  परवाना देण्यात येत होता पण त्या ठिकाणी सातारा जिल्हा हा ऑप्शन येत नसल्यामुळे गैरसोयीचे होत होता पण ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित सातारा जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे . 
http://satarapolice.techcubesolutions.in/UserDashboard.aspx
या संकेतस्थळावर सातारा जिल्ह्यासाठी अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवणाऱ्या वाहनांना पास देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे .
त्याबद्दल नागरिकांनी संबंधित प्रशासनाचे आभार मानले.

सदर  covid19.mpolice याही संकेतस्थळावर सुधारणा करून  सर्व त्रुटी दूर झालेल्या आहेत याही संकेतस्थळावर सातारा जिल्हा समाविष्ठ झालेला दिसून येत आहे त्यामुळे तेथूनही नागरिकांना ऑनलाइन वाहतूक पास उपलब्ध होऊ शकतो .
 updated on 15/4/2020.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .