साळशिरंबे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण .

"कोरोना या साथीच्या  रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण गावात औषध फवारणी केली."


 साळशिरंबे - (प्रतिनिधी) 
संपूर्ण जगभर कोरोना या साथीच्या रोगांना थैमान घातलेले आहे. भारतातही या कोरोनाने  सर्व राज्यांमध्ये 
संसर्ग होत आहे या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी शहर तसेच ग्रामीण भागातही प्रतिबंधक उपाय केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर साळशिरंबे ग्रामपंचायतीच्या वतीने  कोरोना यासाठीच्या रोगाविषयी जनजागृती तसेच  संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात आली .
यावेळी सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

औषध फवारणी करताना ग्रामपंचायत कर्मचारी.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .