उंडाळे पोलीस ठाण्याच्यावतीने कोरोना व संचारबंदी बद्दल जनजागृती रॅली.

"उंडाळे विभागातील पोलीस पाटील संघटनेचाही या जनजागृती रॅलीमध्ये सहभाग "

उंडाळे -प्रतिनिधी (प्रदीप पाटील) 
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने संचारबंदीत वाढ केली या पाश्वभुमीवर उंडाळे परिसरातील उंडाळे पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये संचारबंदी पालन  करण्यासाठी  व सोशन डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठी  जनजागृती रँली आयोजन करण्यात आले.
उंडाळे परिसरात नागरिकांसाठी या कायद्याविषयी माहिती नसल्याने . त्यामुळे अनेकांकडून संचारबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र पोलिसांनी कधी दंडुक्यांचा वापर करत तर कधी प्रेमाने नागरिकांना समजावून सांगत २१ दिवसांची संचारबंदी यशस्वीपणे पूर्ण केली. त्यानंतर राज्यात संचारबंदीत वाढ झाल्याने त्या पाश्वभुमीवर उंडाळे विभागातील सर्व गावातील पोलीस पाटील यांच्या सहयोगाने उंडाळे औट पोस्टच्या उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंडाळे, येळगाळ, येवती भूरभुशी येणपे, साळशिंरबे, जिंती टाळगाव, म्हासोली,पाटीलवाडी विभागातील गाव व वाडी-वस्ती परिसरामध्ये संचारबंदीत उल्लंघन जनजागृती रँली आयोजित करण्यात आली.

संचारबंदीत उंडाळे पोलीस प्रशासन व विभागातील पोलीस पाटील यांचे काम उल्लेखनीय.

पोलिसांमुळेच संचारबंदी काय असते हे अनेक युवकांना कळले. पोलिसांच्या धाकामुळे नागरिक व दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहेत. तसेच वेळोवेळी तपासणी केली जात असल्याने अनावश्यक फिरण्याची हिंमत तरूण वर्ग सुध्दा करताना आता दिसत नाही.
याचे सर्वात मोठे श्रेय पोलीस विभाग  व उंडाळे विभागातील पोलीस पाटील यांना द्यावे लागेल. कर्तव्य बजावताना पुरूष कर्मचाऱ्यांसोबत महिला पोलीस कर्मचारीही सक्षमपणे कर्तव्य बजावत आहेत.
अनेक लोक कोरोनाच्या धाकाने घराबाहेर पडण्यासही घाबरतात, पण पोलीस कर्मचारी अनेक तास चौका-चौकात, ऊन्हात उभे राहून कर्तव्य बजावत आहेत .ऊंडाळे पोलीस ठाण्याच्या व उंडाळे विभागातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीने काढलेल्या या जनजागृती रॅलीचे सर्व विभागातील नागरिकांच्याकडून कौतुक होत आहे .


Comments

  1. उंडाळे पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी तसेच उंडाळे विभागातील सर्व पोलीस पाटील यांनी कोरोना व्हायरस संदर्भात
    जनजागृती करून कोरोना व्हायरसला प्रतिबंधक उपाय एक जनचळवळ करण्याचा उद्देश बाळगल्याबद्दल त्या सर्वांना व त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .