उंडाळे ग्रामपंचायतीकडून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण गावात ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी.
" परिसरातील बाजारपेठेचे व इतर सुविधांच मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे ग्रामस्तरीय कमिटींन घातलं विशेष लक्ष"
कोरोना वायरसची भीषणता दिवसेंदिवस वाढतच आहे, कारोना विषाणू्चे गांभीर्य लक्षात घेता कुणालाही लागण होवू नये म्हणून तसेच कोरोना विषाणूपासून गावातील कोणत्याही नागरिक संक्रमित होऊ नये यासाठी उंडाळे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी मार्फत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात ट्रँकटरद्वारे संपुर्ण गावात दि. ९रोजी गुरुवारी १००लिटर सोडियम हायड्रो क्लोराईड सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
उंडाळे गावात प्रत्येक वार्ड, व गल्लो-गल्ली ट्रॅक्टरने फवारणी करण्यात आली यावेळी सरपंच दादासो पाटील, सदस्य बापुराव पाटील स्वःत हजर राहुन फवारणी केली. तसेच संपूर्ण गावांमध्ये घरोघरी जाऊन फवारणी चे विषयी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां द्वारे खबरदारी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
![]() |



Comments
Post a Comment