अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या शिवाय इतर लोकांच्या गाड्यां मध्ये पेट्रोल येतेच कसे ?
ओळखपत्र धारकांकडून होतोय चुकीचा वापर ?
प्रतिनिधी- अमित शिंदे
देशभर वेगाने वाढत असलेल्या कोरोना साथीला मुकाबला करण्यासाठी देशभर अनेक उपाय योजना चालू आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अतोनात प्रयत्न सुरू केले आहेत देशातील तसेंच राज्यातील सरकार ने लॉकडाउन घोषित केला आहे त्यामुळे फ़क्त आवश्यक सर्व सेवा चालू ठेवल्या आहेत त्या मध्ये सर्व कर्मचारी दिवस रात्र कष्ट घेत आहेत परंतू त्यातील काही कर्मचारी मात्र आपल्या ओळखपत्राचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचे दिसून येत आहेत पेट्रोल पंपा वरती फक्त अत्यावश्यक सेवेतीलच लोकांना पेट्रोल दिले जात असताना रोड वरती इतर नागरिकाच्या गाड्या फिरताना दिसत आहेत अत्यावश्यक सेवेतली लोक कामासाठी फिरणे सहाजिकच आहे. परंतु अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त विना कामी रोड वरती चकरा मारण्याची संख्या वाढत आहे अत्यावश्यक सेवेतील लोक तर आपापल्या कामात व्यस्त असताना रोड वरती फिरणाऱ्या गाड्यांमध्ये पेट्रोल येतच कुटून असा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्याच अर्थ असा की यांना भेटणारे पेट्रोल भेटते कसे ही गोष्ट फार विचार करायला लावणारी आहे काही ठिकाणी पेट्रोल पंप वरती अत्यावश्यक सेवेतील काही कर्मचारी दिवसातून दोन वेळा पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत आणि प्रत्येक वेळी गाडी मात्र बदलेले असते असे चित्र तर सरर्स ठिकाणी पहावयास मिळत आहे लॉक डाउन असताना गावागावात टू व्हीलर वरून फिरणारी टोळकी अजून दिसत आहे मग याच्या गाड्यांच्या मध्ये पेट्रोल येते कसे या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे आणि या गोष्टी बंद झाल्या की पोलीस प्रशासनला गाड्या जप्त करायची पण गरज पडणार नाही तसेच पोलिस यंत्रणेवरही असणारा ताण थोड्याफार प्रमाणात कमी होईल . गेल्या दोन दिवस कराड व परिसरातून पोलीस प्रशासनाने 100 च्या वरती गाड्या जप्त केल्या आहे त्या टू व्हीलर ला जर पेट्रोल च भेटले नसते तर त्या गाड्या फिरल्याच नसत्या अस मत जनतेतून येत आहे .
कोरोणाच्या संसर्गाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने
आपली स्वतःची मूलभूत कर्तव्य ओळखून या साथीच्या रोगाला प्रतिबंध उपाय सामाजिक विलगीकरण हा एकमेव पर्याय शासन स्तरावर राबवण्यात येत आहे त्याला शंभर टक्के प्रतिसाद देणे हे कर्तव्य बनत. तसेच जे लोक अत्यावश्यक सेवेमध्ये गुंतलेले आहेत त्यांनीही आपल्या कर्तव्याची जाण ठेवून समाजाला जागृत करून या संसर्गजन्य साथीला रोखण्यासाठी जनचळवळ उभी करून सामाजिक विलगीकरणासाठी लोकांना प्रवृत्त करुन कोरोणावर विजय मिळवायला सहकार्य करायला हवं.

Comments
Post a Comment