ऊंडाळे सह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.
" जोरदार गारपिटीसह वादळी पाऊस "
ऊंडाळे सह कराड दक्षिण मधील डोंगरी भागात येवती, पाटीलवाडी, येळगाव महासोली, सवादे परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसाने अक्षरशः दोन तास झोडपून काढले, उंडाळे परिसरात शिवारात असणारी झाडे उखडुन पडली. अवकाळी पाऊसामुळे उंडाळे व परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आहे, सद्या या भागात मशागतीचे कामे सुरू आहेत नांगरणी करणे, शेणखत टाकणे, अशी कामे सुरू आहेत अशातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात चैतन्य निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून कोरोनो सारख्या महाभयंकर विषाणू ने अख्या जगाला वेठीस धरले आहे त्याचाच परिणाम राज्यात देखील आहे गेल्या काही दिवसांपासून उंडाळे परिसरात देखील याचा परिणाम दिसला. या सर्व संकटांचा सामना करत जगाचा पोशिंदा मात्र आपल्या शेतीचे कामे करण्यात मग्न आहेत या पडलेल्या पावसामुळे मात्र एक प्रकारे शेतकऱ्यांना उर्जाच मिळाली आहे.परिसरात सर्वत्र शेती कामांना यापुढे वेग येईल.



Comments
Post a Comment