उंडाळे येथे 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कूटर, वॉटर प्युरिफायर, सायकल या वस्तूंचे वितरण.
उंडाळे येथे 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कूटर, वॉटर प्युरिफायर, सायकल या वस्तूंचे वितरण. पंकज पाटील यांचे कार्य कौतुकास्पद. ____मा. आनंदराव पाटील. उंडाळे - प्रतिनिधी. उंडाळे ता.कराड येथे, भाजपा सोशल मीडिया सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील यांच्या वतीने जनतेसाठी पहिल्यांदाच 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल या वस्तूंचे वितरण स्टॉलचे उदघाटन विधान परिषद मा.आमदार मा.श्री.आनंदरावजी पाटील (नाना) व य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मा.श्री.श्रीरंग देसाई (तात्या) यांच्या हस्ते करण्यात आले. पंकज पाटील यांचे कार्य कौतुकास्पद यावेळी मा.आनंदराव पाटील (नाना) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. "उंडाळे विभागामध्ये, आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचे सामाजिक कार्य तळागाळात पोहचवण्याचे काम आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम, सर्व शासकीय योजना सर्वसामान्यान पर्यंत पोहचवून लाभ मिळवून देण्याचे काम आणि सवलतीच्या दरात 50% ऑफर देऊन शाळेतील विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ यांना विविध वस्तू उपलब्ध करून देण्याचे काम मा.पंकज पाटील यांनी केले आहे. ते इत...