Posts

आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करणे अपरिहार्य - डॉ. मारुती सूर्यवंशी.

Image
  आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करणे अपरिहार्य - डॉ. मारुती सूर्यवंशी. कराड - प्रतिनिधी.  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित केंद्रीय अर्थसंकल्प 2026 27 या परिसंवादात मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती डॉ. मारुती सूर्यवंशी  कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलताना, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी - म्हणाले की, या अर्थसंकल्पामध्ये सरकारने विशेष करून संरक्षणावरती मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे व देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबरोबरच देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलेली दिसून येते. तसेच अधिक रोजगार निर्मिती व्हावी ग्रामीण भागाचा विकास व्हावा याकरिता सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी 10 हजार कोटी रु. ची सरकारने तरतूद केलेली दिसून येते. थोडक्यात या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आर्थिक विकासाची गती...

कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे कार्यशाळेचे आयोजन.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे कार्यशाळेचे आयोजन. उंडाळे - प्रतिनिधी. श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव  महाविद्यालयामध्ये संस्थेच्या वतीने क्रिएटिव्ह आर्ट वर्कशॉप या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश म्हणजे दैनंदिन कामकाजाच्या व्यवस्थेतून वेळ काढून आपल्या मनातील कल्पनाशक्तीला वाट मोकळी करून देणे हा होता. म्हणूनच संस्थेच्या सर्व शाखेतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी चित्रकार अमृता डोके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन केले होते.  यावेळी त्यांच्याकडून सोप्या पद्धतीने चित्रकला शिकवण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमावेळी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकार, इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या ...

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्यात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रुजवण्यासाठी इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञान उपयुक्त

Image
  नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्यात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रुजवण्यासाठी इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञान उपयुक्त_____ प्रो.डॉ.अजितकुमार जाधव.   कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण व इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर: आव्हाने व संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. प्रमुख साधन व्यक्ती म्हणून आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे चे इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. अजितकुमार जाधव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्यात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रुजविण्यासाठी इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. अनेक संधी या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या आहेत. पुरावे लेखागारात असलेली माहिती प्रचंड प्रमाणात डिजिटल स्वरूपात मिळत आहे. मोठ्या माहितीचे विश्लेषण, नकाशे विश्लेषण, प्राचीन व्यापारी मार्ग नकाशाच्या साह्याने शोधणे, डिजिटल स्वरूप...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तसेच सध्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औदुंबर धांगेकर(हॉस्पिटल फार्मासिस्ट), परेश बगुल(असिस्टंट प्रोफेसर रुपेश बंधन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेर), सागर मोहिते(हॉस्पिटल फार्मासिस्ट) व अभिजीत दळवी(एरिया सेल्स मॅनेजर दवा इंडिया प्रायव्हेट लि.) हे उपस्थित होते. यावेळी परेश बगुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांनी इतर कोणत्याही वाईट गोष्टीकडे लक्ष न देता अभ्यासात लक्ष देणे, तसेच स्वतःचे करिअर हे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून फक्त डिप्लोमा फार्मसी न करता पुढील शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच औदुंबर धांगेकर, सागर मोहिते व अभिजीत दळवी यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्या ते काम करत असलेल्या क्षेत...

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे विविध स्पर्धेत उज्वल यश.

Image
  शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे विविध स्पर्धेत उज्वल यश.   कराड -  प्रतिनिधी.  श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड च्या विद्यार्थ्यांनी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आयोजित शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धे अंतर्गत, विभागीय स्पर्धा 2026 मध्ये उज्वल यश संपादन केले. या सर्वांचे कराड व परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे, येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटात किरण महादेव कोळी बीए भाग तीन (भूगोल) याचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत अरविंद रामचंद्र लोंढे बीए भाग तीन (हिंदी)याचा द्वितीय क्रमांक आला. मृणाली सचिन पाटील बारावी (कला) हिचा चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक आला.  महाविद्यालयाच्या समूहगीत संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व स्पर्धकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव मा. सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे, सहसचिव प्रशासन, प्र...

कुटुंबवत्सल, त्यागमूर्ती वेणूताईंच्या समर्पनातून यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वास उभारी_____डॉ. भारती पाटील.

Image
कुटुंबवत्सल, त्यागमूर्ती वेणूताईंच्या समर्पनातून यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वास उभारी_____डॉ. भारती पाटील. कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे स्वर्गीय वेणूताई चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. भारती पाटील (कोल्हापूर) होत्या. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या, कुटुंब वत्सल त्यागमूर्ती वेणूताईंच्या समर्पनातूनच यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वास उभारी मिळाली. वेणूताई चव्हाण म्हणजे अप्रतिम त्यागाचे आणि कुटुंब वत्सल स्त्रीचे अत्यंत महान उदाहरण आहे. वडील बडोदा संस्थानाच्या मुंबईतील बंगल्याचे कारभारी होते. त्यामुळे वेणूताईंचे बालपण अत्यंत सुखात, आनंदात होते. संस्थानाच्या परिसरात त्यांचा वावर असल्यामुळे परिपूर्ण सभ्यता त्यांच्या संस्कारात होती. देशात स्वातंत्र्य चळवळ शिगेला पोहोचलेली होती. त्या वातावरणात त्यांचा विवाह यशवंतराव चव्हाण यांच्याशी झाला. यशवंतरावांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. अशा वात...

कराड येथील एन. पी. फिश कंपनीला “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025”

Image
कराड येथील एन. पी. फिश कंपनीला “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025” कराड/प्रतिनिधी कराड येथील सुप्रसिद्ध एन. पी. फिश कंपनीला “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मासे विक्री आणि सीफूड उद्योगात गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहक विश्वास यांचे उच्च मानक निर्माण करणाऱ्या एन. पी. फिश कंपनीच्या कार्याची ही मान्यताच आहे. (स्व.) महादेव सदोजी पाटील आणि श्री. काशिनाथ महादेव पाटील यांनी घालून दिलेल्या परंपरेवर उभारलेल्या या उद्योगाची पुढील पिढीतील वाटचाल पाटील बंधूंनी – श्री. अजित पाटील व श्री. सुनिल पाटील – यांनी यशस्वीपणे पुढे नेली आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाची जोड देत त्यांनी एन. पी. फिश कंपनीला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेले आहे. ताज्या आणि शुद्ध उत्पादनांचा पुरवठा, पर्यावरणपूरक शाश्वत पद्धती, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी आणि कार्यक्षम पुरवठा साखळी यामुळे एन. पी. फिश कंपनीने मासे विक्री व सीफूड क्षेत्रात नवे मानक निर्माण केले आहे. या पुरस्कारामुळे कंपनीच्या संपूर्ण टी...