सभेसाठी जमणाऱ्या गर्दीचे मतात रूपांतर होणारच.
सभेसाठी जमणाऱ्या गर्दीच परिवर्तन मतात नक्की होणार आणि ते मी करणारच – मा.प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभा सध्या राज्यभरात गाजत आहेत. सभेला येणारा प्रचंड जनसमुदाय पाहून विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र सभेला येणारी गर्दी ही मतदानात परावर्तित होत नसते म्हणून विरोधकांकडून टीका होत आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांनी आज जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.
जळगाव येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. विरोधकांकडून सतत आरोप केला जात होता की, सभेत येणारी गर्दी ही मतात परावर्तित होत नसते. यावर बोलताना आंबेडकर यांनी सांगितले की जी गर्दी स्वतःहून आणि स्वतःच्या पैशाने येत असते ती मतांमध्ये देखील परावर्तित होत असते.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, मी लाटेच राजकारण पाहिलं आहे. इंदिरा गांधी यांच्यावेळी देखील त्यांची लाट होती गर्दी जमायची आणि त्याच गर्दीच रूपांतर मतात ही झालं. ते म्हणाले की, वी.पी सिंग यांच्या सभेला सुद्धा गर्दी जमायची आणि त्याच गर्दीच रुपांतर मतात झालेलं आहे. आता अलीकडे मोदींची लाट होती मोठ्या प्रमाणात लोक जमायचे आणि त्या गर्दीच रूपांतर मतात झालेलं आपण पाहिलं आहे. अस बोलताना आंबेडकर यांनी विश्वास व्यक्त केला की, मी माझ्या सभेला जमलेल्या गर्दीच रूपांतर मतांमध्ये करणार आहे.
संपादक -
लोकशाहीत बहुमताला सत्ता संपादन करता येते.वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या सभेला होणाऱ्या गर्दीच रूपांतर मतात नक्की होणार.कारण एक सक्षम पर्याय बहुजनांच्या पूढ निर्माण झालेला आहे.आणि वंचित घटकांना या आघाडीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे आणि तो त्यांच्या अस्तित्वासाठी झटणार ,कारण त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केले आहे.गर्दीचे रूपांतर मतात होणार का ???
यासारखे प्रश्न जनतेची दिशाभूल करण्यासाठी निर्माण केले जात आहेत आणि ते प्रसार माध्यमांच्या द्वारे जनतेपर्यंत पोहोचवला जात आहे .म्हणजे बहुजन संभ्रमित होतो आणि आहे तोच बरा आहे आपली ताकद पोहोचणार नाही या कमीपणाच्या भावनेने तो खचतो हे षडयंत्र केलं जातं .पण परिवर्तन हे अटळ आहे.भारतीय संविधानामध्ये दिलेले बहुजनांना हक्क अधिकार चांगल्या पद्धतीने त्यांना समजले आहेत.
२००४ -२०१४ पर्यंत पार पडलेल्या निवडणुकांच्या सारखी निवडणूक नसणार आहे कारण , जनतेला सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण सोशल मीडियाद्वारे होत आहे ते विचार करत आहेत.
EVM ला कागदी मतपत्र देण्याची व्यवस्था पेपर ट्रेल मशीनद्वारे करण्यात येणार आहे.त्यामुळे मत चोरी होणार नाही. म्हणूनच निवडणुकी अगोदर हे जे वादळ उठवलं जातं याला बहुजनांनी दाद न देता आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्या नियोजनाप्रमाणे गतिमान करण्याची वेळ आहे ,विजय होणार होत आलेला आहे असा इतिहास आहे आणि भविष्यातही बहुजन लोकांच सरकार येणार. आणि भारतामध्ये बहुजनांचा सरकार येणार आणि सत्ता संपादन करणार यात कोणतीही शंका नसणार .

Comments
Post a Comment