बाबा रामदेव यांच्या विरोधात भीम आर्मी सातारा जिल्हा  यांच्यावतीने  दिले निवेदन .

"आक्षेपार्ह विधानाबद्दल त्वरित अटक करुन कारवाई करण्याची केली मागणी .
बाबा रामदेव यांच्या विरोधात निवेदन देताना भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे व पदाधिकारी.
प्रतिनिधी -
भीम आर्मी सातारा जिल्ह्याच्या वतीने बाबा रामदेव यांच्या विरोधात त्वरित अटकेची कार्यवाही करावी यासाठी निवेदन दिले.
बाबा रामदेव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व पेरियार यांच्या अनुयायांना  बौद्धिक आतंकवादी (इंटेलेक्च्युल टेररिस्ट ) असा  शब्द प्रयोग केला याचे निषेधार्थ त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी भीम आर्मी या सामाजिक संघटनेने भारतभर निषेध आंदोलन उभे केले आहे याच धर्तीवर सातारा जिल्हा भीम आर्मीच्या वतीने निषेध करण्यात आला त्याच बरोबर बाबा रामदेव यांच्यावर त्वरित अटकेची कारवाई  करावी म्हणून निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना हे निवेदन देण्यात आले त्या वेळेला भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे ,इम्रान मुल्ला (सुशिक्षित बेरोजगार  महासंघ  जिल्हाध्यक्ष ),सागर कुंभार ,अशोक मस्के( सातारा जिल्हा संघटक भीम आर्मी)  भागवत कांबळे (तालुकाध्यक्ष भीम आर्मी)इ. उपस्थित होते.



 





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .