Posts

Showing posts from April, 2021

रिलायन्स फाऊंडेशन व पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र उमेद ,कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पशुवैद्यकीय दिवस साजरा.

Image
  रिलायन्स फाऊंडेशन व  पशुसंवर्धन विभाग  आणि   महाराष्ट्र उमेद ,कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पशुवैद्यकीय दिवस साजरा. कराड - प्रतिनिधि,  रिलायन्स फाऊंडेशन व  पशुसंवर्धन विभाग  आणि   महाराष्ट्र उमेद ,कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पशुवैद्यकीय दिवस  निमित्ताने सातारा जिल्ह्यातील  महिला  पशुपालकांना  व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगद्वारे  कार्यक्रमाचे आयोजन.  या कार्यक्रमामध्ये रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक मारुती खडके यांनी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करून रिलायन्स फाऊंडेशन  कोणत्या प्रकारे काम करते याबद्दल माहिती दिली  कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री निलेश पवार साहेब तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती कराड यांनी उमेद च्या माध्यमातून  ग्रामीण भागामध्ये बचत गट त्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करणे कसे योग्य आहे व त्यांना घर बसल्या माहिती मिळण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याबद्दल माहिती दिली.  यावेळी डॉक्टर अंकुश  परिहार उपायुक्त पशुसंवर्धन विभाग सातारा...

कोडोली ता. कराड येथे वादळी वाऱ्याने जनावरांचे शेड व शेतीचे नुकसान.

Image
  कोडोली ता. कराड येथे वादळी वाऱ्याने जनावरांचे शेड व शेतीचे नुकसान. कार्वे प्रतिनिधी :-                       कोडोली तालुका कराड येथे वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने संभाजी शंकर जगताप यांच्या जनावराच्या शेडवर झाड पडून शेडचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सदरची घटना वाकान नावाच्या शिवारात घडली  असून जनावरांच्या शेडा जवळ प्रचंड मोठे पिंपरनेचे  झाड वादळी वाऱ्यामुळे मुळासकट उखडून शेडा वरती कोसळले यामध्ये  सिमेंटचे पोल मधून तुटले आहेत.  तसेच  मोठ्या प्रमाणात पत्र्याचे नुकसान झाले आहे.  यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.   काही ठिकाणी  ऊस पिकाचेही सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व गारपीटसह पावसामुळे  नुकसान झाले आहे.सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून काही भागामध्ये झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला.  लॉकडाऊन मुळे लोकांची आर्थिक घडी बिघडली असून वरून हे आसमानी तुफानी संकटाने लोकांना बेजार केले आहे.सदर घटनेचा पंचनामा कोडोलीचे तलाठी विलास थोरात यांनी...

लॉकडाऊन वाढवा पण सर्वसामान्यांच्या समस्या पण सोडवा. ______ दिपक कांबळे.

Image
  लॉकडाऊन वाढवा पण सर्वसामान्यांच्या समस्या पण सोडवा. ______ दिपक कांबळे. सातारा:राज्य सरकारने लॉकडाऊन जरूर वाढवावा.पण सर्व सामान्य जनतेच्या समस्या पण शासनाने सोडवाव्यात अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी राज्यसरकारकडे केली आहे. सध्या राज्यसरकारला कोरोना सोडून कोणताच विषय महत्वाचा नाही का? असा प्रश्न जनतेला पडला आहे. कोरोनापेक्षा आर्थिक समस्या ही महत्वाची आहे कारण सगळे जग  *अर्थकारण* या फक्त एकाच विषयावर फिरत आहे. आज सर्व सामान्य माणूस या कोरोनामुळे गेले वर्षभर मेटाकुटीला आला आहे.बरं कोरोना आहे,लॉकडाऊन चालू आहे म्हणून शासन काय गप्प बसले आहे का? सरकारची करवसुली चालू,वीजबिल वसुली चालू,बँकांची कर्जवसुली चालू,खाजगी सावकारी वसुली चालू, आयकर कर चालू  मग सर्व सामान्य जनतेने असेच कोरोनाच्या आणि नावाखाली असेच किती दिवस लटकत बसायचे ? आधी सरकारने जनतेच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवला पाहिजे, ज्यांचे आज हातावर पोट आहे त्यांची आज अवस्था बघा काय झाली आहे अक्षरशः भीक मागायची वेळ या लोकांवर आली आहे.मध्यमवर्गाची तर अवस्था भीक मागू पण शकत नाही आणि...

ढेबेवाडी मध्ये विनाकारण फिरणाऱ्याची कोविड टेस्ट ,61 नागरिकांची टेस्ट, 4 पॉजेटीव्ह

Image
  ढेबेवाडी मध्ये विनाकारण  फिरणाऱ्याची  कोविड टेस्ट ,61 नागरिकांची टेस्ट, 4 पॉजेटीव्ह.   सातारा:(सागर पाटील)ढेबेवाडी विभागात महसूल विभाग,ढेबेवाडी, मंद्रुळकोळे ग्रामपंचायत, पोलीस, प्रशासन  विभागाच्या वतीने  प्राथमिक आरोग्य केंद्र सणबुर यांच्या अंतर्गत विनाकारण फिरणाऱ्यांना थांबवत त्यांची रॅपीड चाचणी केली जात असून एका तासात 61जणांची चाचणी केली त्यापैकी 4व्यक्ती पोजेटीव्ह असून त्यांना  ॲम्बुलन्स मध्ये बसवून ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे घेऊन जाण्यात  आले.  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संचारबंदीच्या  काळात सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम करण्याच्या सुचना तहसीलदार  योगेश्वर टोपे  यांनी दिल्या आहेत. शुक्रवारी  सकाळी ढेबेवाडीमध्ये गर्दी झाल्याचे चित्र होते.  . यावेळी  ग्रामपंचायत सरपंच अमोल पाटील, ढेबेवाडी सरपंच विगावे,सर्कल प्रवीण शिंदे,पी.एस आय माने,पोलीस पाटील विजय लोहार,गोपनीय नवनाथ कुंभार,पोलीस प्रशासन,डॉ.सुनील जाधव,डॉ.कोमल लोकरे,के.सी तडवी,शंतुनो पाटील,स्वनिल सुतार,डॉ.बंडू गोडेकर, बर्डे मॅडम,मेघा...

"ब्रेक द चेन"च्या काळात वाढती साठेबाजी, महागाई ..

Image
 "ब्रेक द चेन"च्या काळात वाढती साठेबाजी, महागाई .. दक्षिणमांड तिरावरुन_______   "ब्रेक द चेन" कोरोना महामारीच्या काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक ठिकाणी छुप्यापद्धतीने चढय़ा दराने वस्तूंची विक्री सुरु आहे. मागील वर्षीच्या  लॉकडाऊनमुळे अगोदरच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून हातात पैसे नाहीत आणि त्यात महागाईचा भडका यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. अशावेळी महागाईला रोखणार कसे?  सरकारच्या दुर्लक्षामुळे महागाई वाढत असल्याचे सांगत साठेबाजी करणा-या व्यापा-यांवर कठोर कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा व्यापा-यांवर कडक कारवाई व्हावी..   देशासह राज्यात निर्माण झालेल्या  महामारी संकटाचा लाभ घेत काही दुकानदार चढय़ा भावाने वस्तूंची विक्री करत आहेत. गृहोपयोगी, जीवनावश्यक वस्तू जनतेला खरेदी करणे   आवश्यकच असतात हे ओळखूनच काही दुकानदार संकटाच्या  परिस्थितीत वस्तूची टंचाई असल्याचे सांगून  गैरफायदा घेत आहेत. सरकार म्हणते जीवनावश्यक वस्तूंचा साठा मोठय़ा प्रमाणात असून त्याचा पुरवठाही दुकानदारांना...

शेतकऱ्यांना आता मिळणार 42 योजनेची महिती 1 क्लीक वर..

Image
  शेतकऱ्यांना आता मिळणार 42 योजनेची महिती 1 क्लीक वर.. ब्यूरो  रीपोर्ट - प्रदिप पाटिल. शेतकऱ्यांना कोणत्याही योजने ची महिती नसते म्हणून शेतकऱ्यांना लाभ पण मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनासाठी 1 क्लीक वर 42 योजने ची महिती मिळणार आहे तर कसे प्रकारे मिळणार आहे आपण त्या सुध्दा पहाणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर हा  9404396119 नंबर whatsapp मध्ये save करायचा आहे. नंबर save केले नंतर तुम्हाला whatsapp वर नवीन योजने  sms send करयाचा आहे . तुम्हाला मग 42 योजनेची महिती आणि आणि कागदपत्र काय लागतात सर्व महिती तुम्हाला whatsapp. वर मिळाले या योजनेची महिती पाह्यजे असले तर तुम्हाला हे क्लीक करावे लागेल .सूक्ष्म सिंचन या योजनासाठी हे टाईप करू शकता- pmksy .कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी हे टाईप करू शकता- smam फळबागेच्या योजनांसाठी तुमी हे टाईप करू शकता – Horti & फळबाग पिकविमासाठी तुमी हे टाईप करू शकता- पिकविमा & pmfby मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी तुम्हाला हे टाईप करावे लागेल – mts आणि शेततळे. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनासाठी तुमी हे टाईप करा-gmsav...

अळिंबी उत्पादन प्रकल्प (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

Image
  अळिंबी उत्पादन प्रकल्प (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत) ब्यूरो  रीपोर्ट - प्रदिप पाटील. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत अळिंबी (मशरूम) उत्पादन १. कोण सहभाग घेऊ शकतात  अ . अ. वैयक्तिक शेतकरी, राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपनी यांना अर्थसहाय्य देय  आहे  २. अर्थसहाय्य -   अ. वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी या घटकासाठीचे अनुदान बँक कर्जाशी निगडित असून प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के अनुदान देय  आहे. सदरील अनुदान बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय  आहे. ब. राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपनी यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट  असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे पुरावे सादर करावे लाग...