कोडोली ता. कराड येथे वादळी वाऱ्याने जनावरांचे शेड व शेतीचे नुकसान.
कोडोली ता. कराड येथे वादळी वाऱ्याने जनावरांचे शेड व शेतीचे नुकसान.
कार्वे प्रतिनिधी :-
कोडोली तालुका कराड येथे वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने संभाजी शंकर जगताप यांच्या जनावराच्या शेडवर झाड पडून शेडचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सदरची घटना वाकान नावाच्या शिवारात घडली असून जनावरांच्या शेडा जवळ प्रचंड मोठे पिंपरनेचे झाड वादळी वाऱ्यामुळे मुळासकट उखडून शेडा वरती कोसळले यामध्ये सिमेंटचे पोल मधून तुटले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पत्र्याचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
काही ठिकाणी ऊस पिकाचेही सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व गारपीटसह पावसामुळे नुकसान झाले आहे.सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून काही भागामध्ये झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. लॉकडाऊन मुळे लोकांची आर्थिक घडी बिघडली असून वरून हे आसमानी तुफानी संकटाने लोकांना बेजार केले आहे.सदर घटनेचा पंचनामा कोडोलीचे तलाठी विलास थोरात यांनी केला असल्याचे सांगितले.

पंचनामे लवकर करून भरपाई द्यावी ही विनंती आहे
ReplyDelete