लॉकडाऊन वाढवा पण सर्वसामान्यांच्या समस्या पण सोडवा. ______ दिपक कांबळे.

 लॉकडाऊन वाढवा पण सर्वसामान्यांच्या समस्या पण सोडवा.
______ दिपक कांबळे.

सातारा:राज्य सरकारने लॉकडाऊन जरूर वाढवावा.पण सर्व सामान्य जनतेच्या समस्या पण शासनाने सोडवाव्यात अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी राज्यसरकारकडे केली आहे. सध्या राज्यसरकारला कोरोना सोडून कोणताच विषय महत्वाचा नाही का? असा प्रश्न जनतेला पडला आहे. कोरोनापेक्षा आर्थिक समस्या ही महत्वाची आहे कारण सगळे जग  *अर्थकारण* या फक्त एकाच विषयावर फिरत आहे.

आज सर्व सामान्य माणूस या कोरोनामुळे गेले वर्षभर मेटाकुटीला आला आहे.बरं कोरोना आहे,लॉकडाऊन चालू आहे म्हणून शासन काय गप्प बसले आहे का? सरकारची करवसुली चालू,वीजबिल वसुली चालू,बँकांची कर्जवसुली चालू,खाजगी सावकारी वसुली चालू, आयकर कर चालू  मग सर्व सामान्य जनतेने असेच कोरोनाच्या आणि नावाखाली असेच किती दिवस लटकत बसायचे ? आधी सरकारने जनतेच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवला पाहिजे, ज्यांचे आज हातावर पोट आहे त्यांची आज अवस्था बघा काय झाली आहे अक्षरशः भीक मागायची वेळ या लोकांवर आली आहे.मध्यमवर्गाची तर अवस्था भीक मागू पण शकत नाही आणि  भीक देऊ पण शकत नाही अशी झाली आहे.यामध्ये फक्त उच्चवर्गीय  लोकच ऐशआरामात जगत आहेत.

आज सर्वसामान्य लोकांना जर कोरोना झाला तर त्यांची एवढी पण ऐपत नाही की त्याचा उपचार करू शकतील आणि सरकारी यंत्रणा तेवढी सक्षम नाही की एवढ्या लोकांची आरोग्यव्यवस्था करू शकेल .आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये तर सरळ लूटमार चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मरण पत्करणे हाच एकमेव उपाय राहिला आहे कारण सगळे अर्थचक्रच बिघडले आहे.मंत्री ,आमदार,खासदार यांना सर्वसामान्य जनता फक्त मतापुरतीच दिसते की काय कळत नाही.? याला काही लोकप्रतिनिधी अपवाद असतीलही ! पण सरसकट विचार केला तर कशाला कशाचा मेळ लागत नाही अशीच अवस्था आता सर्वसामान्य जनतेची झाली आहे.तरी राज्यसरकारने याचा गांभीर्याने विचार करून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशीही मागणी दिपक कांबळे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .