रिलायन्स फाऊंडेशन व पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र उमेद ,कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पशुवैद्यकीय दिवस साजरा.
रिलायन्स फाऊंडेशन व पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र उमेद ,कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पशुवैद्यकीय दिवस साजरा.
कराड - प्रतिनिधि,
रिलायन्स फाऊंडेशन व पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र उमेद ,कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पशुवैद्यकीय दिवस निमित्ताने सातारा जिल्ह्यातील महिला पशुपालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचे आयोजन.
या कार्यक्रमामध्ये रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक मारुती खडके यांनी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करून रिलायन्स फाऊंडेशन कोणत्या प्रकारे काम करते याबद्दल माहिती दिली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री निलेश पवार साहेब तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती कराड यांनी उमेद च्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये बचत गट त्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करणे कसे योग्य आहे व त्यांना घर बसल्या माहिती मिळण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याबद्दल माहिती दिली.
यावेळी डॉक्टर अंकुश परिहार उपायुक्त पशुसंवर्धन विभाग सातारा
डॉक्टर प्रवीण पवार सहाय्यक उपायुक्त पशुसंवर्धन विभाग मुख्यालय सातारा यांनी शेतकऱ्यांचे स्वागत केले पशुपालकांना जागतिक पशुवैद्यकीय दिवस याचे महत्त्व सांगितले व शुभेच्छा दिल्या डॉक्टर प्रविण पवार यांनी सातारा जिल्ह्यातील पशुपालकांना त्याच्या जनावरांना उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर माहिती दिली उन्हाळी गोटा व्यवस्थापन गायींना म्हशींना कशा पद्धतीने चारा व्यवस्थापन केले पाहिजे, जनावरांना शुद्ध थंड पाणी किती प्रमाणात दिले पाहिजे, तसेच शासनाच्या वतीने जनावरांना वर्षभरामध्ये कोणकोणती लसीकरण ना केली जातात व कोणत्या महिन्यात करावी लागतात याचे वेळापत्रक सांगितले बचत गटातील महिलांना अगदी शेळी पालन कोंबडी पालन म्हैस पालन गाय पालन याबद्दल उन्हाळ्यात कोण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.
अगदी शेळी पालन कोंबडी पालन म्हैस पालन गाय पालन याबद्दल उन्हाळ्यात कोण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले जनावरांना उन्हाळ्यामध्ये कोण कोणते आजार होतात व त्यावर प्रथमोपचार कसा करायचा याबद्दल पण माहिती दिली जनावरांचे जंत निर्मूलन किती महत्त्वाचे आहे व ते कसे किती दिवसांनी करायचे याबद्दल पण माहिती दिली कोंबडी पालना मध्ये ग्रामीण भागामध्ये व्यवसायिक कोंबडी पालन कसे करावे त्यामध्ये जास्त अंडी व माऊस याबद्दल सविस्तर माहिती दिली जनावरांच्या विविध आजाराबद्दल कार्यक्रमांमध्ये थोडक्यात सांगितले
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला कराड तालुक्यातील उमेद च्या बचत गटातील महिलांचा उस्फूर्तपणे सहभाग होता.
या कार्यक्रमामध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने श्री मारुती खडके सरांनी रिलायन्स टोल फ्री क्रमांका बद्दल माहिती दिली टोल फ्री नंबर 1800 419 8800
या नंबर वर सुद्धा शेतकऱ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याबद्दल सविस्तर विवेचन केले व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रश्न टोल फ्री नंबर वर विचारून आपल्या शंकांचे निरसन करावे.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री निलेश पवार तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती कराड यांनी डॉ. अंकुश परिहार व डॉ. प्रवीण पवार सर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले.

Comments
Post a Comment