ढेबेवाडी मध्ये विनाकारण फिरणाऱ्याची कोविड टेस्ट ,61 नागरिकांची टेस्ट, 4 पॉजेटीव्ह

 ढेबेवाडी मध्ये विनाकारण  फिरणाऱ्याची  कोविड टेस्ट ,61 नागरिकांची टेस्ट, 4 पॉजेटीव्ह.


 सातारा:(सागर पाटील)ढेबेवाडी विभागात महसूल विभाग,ढेबेवाडी, मंद्रुळकोळे ग्रामपंचायत, पोलीस, प्रशासन  विभागाच्या वतीने  प्राथमिक आरोग्य केंद्र

सणबुर यांच्या अंतर्गत विनाकारण फिरणाऱ्यांना थांबवत त्यांची रॅपीड चाचणी केली जात असून एका तासात 61जणांची चाचणी केली त्यापैकी 4व्यक्ती पोजेटीव्ह असून त्यांना  ॲम्बुलन्स मध्ये बसवून ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे घेऊन जाण्यात  आले. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संचारबंदीच्या  काळात सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम करण्याच्या सुचना तहसीलदार  योगेश्वर टोपे  यांनी दिल्या आहेत. शुक्रवारी  सकाळी ढेबेवाडीमध्ये गर्दी झाल्याचे चित्र होते.  . यावेळी  ग्रामपंचायत सरपंच अमोल पाटील, ढेबेवाडी सरपंच विगावे,सर्कल प्रवीण शिंदे,पी.एस आय माने,पोलीस पाटील विजय लोहार,गोपनीय नवनाथ कुंभार,पोलीस प्रशासन,डॉ.सुनील जाधव,डॉ.कोमल लोकरे,के.सी तडवी,शंतुनो पाटील,स्वनिल सुतार,डॉ.बंडू गोडेकर, बर्डे मॅडम,मेघा मराठे,एस एस चोपडे, विद्या कारंडे, सर्व आरोग्य कर्मचारी  उपस्थित होते.  विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिसून आल्याने तहसीलदार  यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड अँन्टीजन चाचणी करण्याच्या सुचना दिल्या. नागरिकांनी सुधा विनाकारण ढेबेवाडी मध्ये फिरू नये व मास्कचा वापर करावा.अनेक नागरिक ढेबेवाडी चालू आहे का बंद आहे बघण्यासाठी  फिरताना आढळून आले आहेत. इथून पुढे जे नागरिक ढेबेवाडी मध्ये विनाकारण  फिरताना आढळतील त्यांची चाचणी केली जाणार आहे.

 यात पायी फिरणारे, दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये फिरणाऱ्यांनाही थांबवून त्यांच्या चाचण्या केल्या. याशिवाय मास्क न घालता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांना आळा बसणार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .