भीम आर्मी संविधान रक्षक दल संघटनेच्या तडसर शाखेचे उद्घाटन.
भीम आर्मी संविधान रक्षक दल संघटनेच्या तडसर शाखेचे उद्घाटन. कडेगांव - प्रतिनिधी. भीम आर्मी संविधान रक्षक दल संघटनेच्या तडसर शाखेचे उद्घाटन भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. उत्तरेश्वरजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीद घेऊन भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. प्रफुल्ल भाई शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर समाज जागृतीचे काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातही संघटनेचे काम दिवसेंदिवस वाढत आहे. या ध्येयाने प्रेरित होऊन भीम आर्मी संविधान रक्षक दल तडसर शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती मा. उत्तरेश्वरजी कांबळे यांची होती. त्याचबरोबर मा. जगन्नाथ वाघमारे. सांगली जिल्हाध्यक्ष, मा. आबासो सोन ताटे.सांगली जिल्हा उपाध्यक्ष,मा. सूर्यकांत सरतापे. सांगली जिल्हा संघटक, मा. सुशील सोनताटे. कडेगाव तालुकाध्यक्ष, मा. दिलीप थोरात. कडेगाव तालुका उपाध्यक्ष, मा. नामदेव मोहिते.कडेगाव तालुका संघटक, मा. सुरज लादे. शाखाप्रमुख तडसर, ...