शिराळा तालुक्यात बारावी कला शाखेच्या निकालात वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागाव सर्वप्रथम.
शिराळा तालुक्यात बारावी कला शाखेच्या निकालात वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागाव सर्वप्रथम.
शिराळा - प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांवने एच. एस.सी. परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये उज्वल यश संपादन केले.वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव 12 वी बोर्ड परीक्षेत 100% निकाल नोंदविला तसेच विशेष म्हणजे शिराळा तालुक्यात कला शाखेत सर्वप्रथम सन्मान मिळवला.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांवची विद्यार्थ्यांनी कु. पाटील प्रणाली बाजीराव हिने 78 % गुण संपादित करून शिराळा तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा सन्मान मिळवला . तर विद्यालयातील कु. देसाई पल्लवी संपत तिने 76. 67 % गुण मिळवून शिराळा तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला .
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव ची शिराळा तालुक्यातील गुणवंत कॉलेज म्हणून खास ओळख आहे. वारणा ज्युनिअर कॉलेज ने सन 2004 मध्ये कोल्हापूर विभागीय बोर्ड गुणवत्ता यादीत कु.रूपाली कृष्णा पाटील हिने तेरावा क्रमांक मिळवून शिराळा तालुक्याचे बोर्ड गुणवत्ता यादीत नाव कोरले आहे. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव गुणवंत यादीत नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. या कॉलेजने प्रशासकीय अधिकारी शिक्षक घडविले आहेत .शिराळा तालुक्यात कला शाखेतील वैशिष्ट्यपूर्ण व गुणवंत कॉलेज म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव च्या यशात संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती चंद्रकांत पाटील ( भाऊ) तसेच सर्व संचालक , तसेच कॉलेजचे आजी माजी मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मोलाची ठरली आहे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.सी. सदावर्ते , प्रा. बी. एम.नलवडे प्रा. एस.डी . जमदाडे, व्ही. डी. पाटील, श्रीम. एस.बी. दिवे, व साळुंखे ए. बी. मॅडम , पी.एस्, सुतार सर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक हे यशाचे मानकरी आहेत.वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव चे यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Comments
Post a Comment