वारणा विद्यालय ज्युनिअर कॉलेज सांगाव मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात.

 वारणा विद्यालय ज्युनिअर कॉलेज  सांगाव मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात.


शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्येआंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. सी. सदावर्ते सर यांनी पतंजली योग समिती अध्यक्षा,सर्व सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर प्रास्ताविक क्रीडा शिक्षिका ए. आर. पाटील मॅडम यांनी केले. आंतरराष्ट्रीय योगदिनी पतंजली योग समिती शिराळा अध्यक्ष विद्या पाटील मॅडम व माजी मुख्याध्यापक श्री . अरुण पाटील सर यांचेसह हंबीरराव कोरे अशोक साळुंखे किरण मिंचेकर के. वाय. पाटील मॅडम उत्तम काळगावकर सदाशिव वाघ आदींनी योग प्रात्यक्षिके आसने सूर्यनमस्कार आदी घेऊन योग दिन उत्साहात साजरा केला .योग दिन प्रार्थना मानेचे व्यायाम विविध आसने सूर्यनमस्कार प्राणायाम सूक्ष्म व्यायाम प्रकार शांतीपाठ या क्रमाने योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रकारे करून घेतली. या दिनास विद्यालयातील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते . सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना केळी , शेंगदाणे चिक्की खाऊ वाटप करण्यात आले.योग दिनाचे आभार प्रदर्शन श्री. बी. एम. नलवडे सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .