साळशिरंबे आमदार केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन.
साळशिरंबे येथे "आमदार केसरी " भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन.
कराड तालुक्यातील मौजे साळशिरंबे येथे बुधवार दि. १ जानेवारी २०२५ रोजी भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचे आयोजन पंकज पाटील मिञ परिवाराच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सोशल मिडीया सातारा जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली.कृष्णा उद्योग समुहाचे शिल्पकार सहकार महर्षी स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या 100 व्या जयंतीदिना निमित्त मा.आ.डॉ.अतुलबाबा भोसले हे प्रचंड मताधिक्याने निवडून आमदार झाल्याबध्दल नवीन वर्षावर कराड तालुक्यातील पाहिले ओपन बैलगाडी शर्यत मैदान होत असून, अतुलपर्व १ ले पर्व म्हणून "आमदार केसरी" भव्य ओपन बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रथम पारितोषिक १ लाख रु. व ढाल, बक्षीस ठेवण्यात आले आहे, व्दितीय पारितोषक ७१ हजार १११ रु. व ढाल, तृतीय पारितोषिक ५१ हजार १११ रु. व ढाल, चतुर्थ पारितोषक ३१ हजार १११ रु. व ढाल, पंचम पारितोषक २१ हजार १११ रु. व ढाल, सहावा पारितोषक १५ हजार १११ रु. व ढाल, सातवा पारितोषक ११ हजार १११ रु. व ढाल. सर्व फायनलच्या गाडी चालकास मानाचे फेटे देण्यात येणार आहेत.शर्यातीस प्रमुख उपस्थिती आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले, माजी आमदार श्री.आनंदराव पाटील (नाना), कृष्णा विश्व विद्यापीठ विश्वस्थ मा.विनायकजी भोसले (बाबा) यांची राहणार आहे.

Comments
Post a Comment