तानाजी देशमुख यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद.

 तानाजी देशमुख यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद.

___आमदार डॉ. अतुलबाबा भोसले 

मलकापूर - प्रतिनिधी. 

  कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या  जयंती दिनानिमित्त  शास्त्रीनगर  विभागातील प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना तसेच आयुष्यमानभारत योजना शिबिराचे मोफत आयोजन केले होते. या उपक्रमाला आमदार डॉ. अतुल भोसले,  कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.  

     यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले कि तानाजी देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,पत्रकारिता, राजकीय,क्षेत्रांत सक्रिय आहेत त्यांनी भाजप पक्षात विविध पदांवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे शहरातील अनेक  सामाजिक समस्या मग पाणीप्रश्न, महामार्गावर होणारे अपघात,  विकास आराखडा, कचरा डेपो, सांडपाणी, रखडलेल्या     विकासकामांच्या प्रश्नां साठी  वेळ  प्रसंगी   आंदोलनाच्या  माध्यमातून  वाचा  फोडून प्रशासनाच्या पर्यंत समस्या पोहचवून समन्वयाने अनेक यशस्वी मार्ग काढले आहेत.

         शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्व कला,   तरुणांसाठी हात कुस्ती स्पर्धा, रक्तदान  शिबिरे, नागरिकांसाठी, आरोग्य शिबीर, तसेच लाडकी बहीण योजना, बांधकाम कामगार योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना,आयुष्यमानभारत योजना, अशा अनेक  केंद्र व राज्यशासनाच्या शासनाच्या  कल्याणकारी  योजना  सर्व सामान्य नागरिकांच्या पर्यंत  पोहोचली आहेत विधायक उपक्रम राबवत असताना लोकांशी असणारा जनसंपर्क व समयसूचकता या मुळे देशमुख यांचे कार्य नेहमीच उठावदार दिसते त्यांच्या भावी सामाजिक, राजकीय, वाटचालीस माझ्या शुभेच्छा पाठीशी आहेत असे आमदार भोसले म्हणाले. 

शिबीर यशस्वी करण्यासाठी  माणिक साळुंखे, हर्षल जगताप, स्वप्निल पाटील, विजय देशमुख,  राजेंद्र शिंगण, सुनील मगदूम, मंगेश सुरवसे,विशाल सिद्ध, रामेश्वर पाटील, फारुख बागवान,सुरेश शिंगण,  रोहित माने, अजय थोरात,ऋषीकेश सुरवसे, रितेश बारगजे, अभिजित रैनाक,पंकज सावंत, पात्रेसर,डॉ. अमोल मोटे,  सागर माने, अनिल दरबारी,विश्वास चौगुले, तानाजी शिंदे,अनिल कावरे, संदीप शिंगण, रोहित  यादव, आशासेविका  अनिता मोहिते,सौ. थोरात, यांनी परिश्रम घेतले,  



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .