शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये महिला महाविद्यालयाचे उज्ज्वल यश.


शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये महिला महाविद्यालयाचे उज्ज्वल यश.



कराड - प्रतिनिधी.
कराड येथील शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालय, कराड या महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाने शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराडच्या मैदानावर केले होते. या स्पर्धेचे यजमानपद असणाऱ्या महिला महाविद्यालयाने बलाढ्य असणाऱ्या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचा अंतिम फेरीत आठ विकेट राखून स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले.
         या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग नोंदविला होता.यामध्ये एकूण 12 सामने खेळविण्यात आले.या सामन्यामध्ये औंध,उंब्रज महाविद्यालयाच्या संघांना पराभूत करत यजमान संघाने अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचा पराभव करत हा संघ शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
         या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण मंडळ, कराडचे कौन्सिल सदस्य ॲड. अरविंद घाटे यांनी केले. याप्रसंगी श्री. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य श्री. ए. एम. मुल्ला, उपप्राचार्य श्री.हणमंत कुंभार, शारीरिक शिक्षण विभाग बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन डॉ. महेंद्र कदम-पाटील, सातारा विभागीय क्रीडा परिषदेचे सचिव प्रा. माणिक गोरवे, महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग सोनटक्के उपस्थित होते. समारोप प्रसंगी बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण चे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दीपक डांगे-पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.उद्घाटन व समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अखिलेश शिंदे यांनी केले.महिला महाविद्यालयाच्या संघास प्रा. स्मिता जगताप(शारीरिक शिक्षण संचालक) ,प्रा. प्रवीण बिरमुळे,प्रा. अमोल हुलवान,प्रा. सचिन कर्चे,प्रा. विनोद सागरे, प्रा. तेजस चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.विजेत्या संघाचे शिक्षण मंडळाचे पदाधिकारी श्री. बाळासाहेब कुलकर्णी,श्री. चंद्रशेखर देशपांडे,श्री. राजेंद्र लाटकर ,श्रीमती. अनघा परांडकर, प्र. प्राचार्य स्नेहल प्रभुणे यांनी अभिनंदन केले. सदर स्पर्धेचा अंतिम निकालात प्रथम क्रमांक-महिला महाविद्यालय,कराड, द्वितीय क्रमांक-सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड, तृतीय क्रमांक-यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड,चतुर्थ क्रमांक-सौ. मंगलाताई जगताप महिला महाविद्यालय,उंब्रज. या महाविद्यालयांनी पटकावला. 


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .