सकल आंबेडकरी समाज शिराळा तालुका यांच्यावतीने निवेदन.

 सकल आंबेडकरी समाज शिराळा तालुका यांच्यावतीने निवेदन.

शिराळा प्रतिनिधी -  नानासाहेब कांबळे.

 सकल आंबेडकरी समाज शिराळा तालुका यांच्यावतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक शिराळा पोलीस स्टेशन तसेच कोकरूड पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेध म्हणून  निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा. तसेच परभणी  येथे घडलेल्या  घटनेमध्ये भीम सैनिकांवरती गुन्हा  दाखल केले आहेत ते  परत घ्यावे, सोमनाथ सूर्यवंशी यांना  न्याय मिळावा त्यांच्या घरातल्यांना 50 लाखाची मदत मिळावी असे या निवेदनामध्ये नमूद केले आहे. हे निवेदन देण्यासाठी शिराळा तालुक्यातील धम्म बंधू आणि भगिनी या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .