कल्याण येथील अत्याचारी नराधमाचा जाहीररीत्या एन्काऊंटर करा: दयानंद शिवजातक.
कल्याण येथील अत्याचारी नराधमाचा जाहीररीत्या एन्काऊंटर करा: दयानंद शिवजातक.
भारतीय दलित महासंघ यांचे वतीने तहसीलदार शिराळा यांना निवेदन.
शिराळा - प्रतिनिधी.
कल्याण या ठिकाणी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरोपी विशाल गवळी याचा जाहिररीत्या एन्काऊंटर करा अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे . सदरची घटना अतिशय निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी असून वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे मुलींच्या व पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . सदरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून जनमानसात संतापची लाट उसळलेली आहे. शासनाने सदरच्या निंदनीय घटनेची संवेदनशीलरित्या दखल घेऊन बदलापूर या ठिकाणी ज्याप्रमाणे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर अक्षय शिंदे या नराधमाचा एन्काऊंटर करून संबंधित पिढीतेला न्याय देण्यात आला होता , त्याचप्रमाणे विकृत मानसिकतेच्या विशाल गवळी या नराधमाचा जाहीररित्या एन्काऊंटर करण्यात यावा व संबंधित पिढीतेला व तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा .अशी मागणी जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी निवेदणाद्वारे केली आहे.
यावेळी विनोद आढाव,रोहित महिंद,शुभम साखरे,मारुती सातपुते, अमोल बडेकर, प्रकाश पाटील,धनाजी तुपारे,निलदीप कांबळे, शशिकांत कांबळे,विनोद कांबळे उपस्थित होते.

Comments
Post a Comment