कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी शिवाजी नेर्ली यांचे एज्युकेशन मॉरल्स अँड इनव्हारमेंटल सायन्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावरती व्याख्यान झाले.

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व असावे तसेच पर्यावरण शास्त्र संदर्भात स्वतःचा व्यक्तिमत्व विकास का आवश्यक आहे व तो कसा करावा याविषयी शिवाजी नेर्ली यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन केले. 

यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री जगदाळे व आभार प्रा. मोनिका शिंदे  यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .