Posts

भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार.

Image
  भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार. शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे. भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने माजी सैनिकांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला.महामानवाच्या मुर्तींचे पुजन बाळू घोलप यशवंत घोलप यांनी केले.माजी सैनिक पांडुरंग घोलप दाजी शंकर घोलप भाऊ यांचा सत्कार उप सरपंच सुरेश जाधव नाना यांच्या हस्ते करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक सुनिल घोलप यांनी केले.पायल सिध्दार्थ यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन राजेश मिसाळ यांनी केले, तर आभार संदिप घोलप यांनी मानले. नियोजन गणेश ,शुभम,आयुष घोलप यांनी केले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर.

Image
  सहाय्यक  पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त   रक्तदान शिबिर. तळमावले - प्रतिनिधी.  रक्तदान  हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये, स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव,तसेच ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे  सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून भव्यरक्तदान शिबिराचे 30 जानेवारी रोजी स्थळ ढेबेवाडी पोलीस ग्राऊंड येथे सकाळी 10 ते 4 पर्यँत आयोजन केले आहे.याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील नवनाथ कुंभार ,तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांनी केले आहे.

मळाईदेवी नागरी पतसंस्था जखिणवाडी शाखा वाठार येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Image
  मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था मर्या. जखिणवाडी  शाखा वाठार  येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. " मा. संतोष आवळकर यांच्या हस्ते  ध्वजारोहण." कराड  - प्रतिनिधी.  भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात देशभर साजरा झाला.  मळाईदेवी नागरी पतसंस्था मर्या. जखिणवाडी शाखा वाठार  येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण मा. संतोष आवळकर यांच्या हस्ते झालं.यावेळी पतसंस्थेचे कर्मचारी शाखाधिकारी  उत्तम पाटील,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

किरपे (ता- कराड) येथे बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण.

Image
  किरपे (ता- कराड) येथे  बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये  भीतीच वातावरण. कोळे प्रतिनिधी - अक्षय कांबळे. संकेत कडाळे यांचा शेळीवर बिबट्याने आज   (दि.२५ जानेवारी.)सुमारे पावणे पाचच्या सुमारास  सुपने किरपे नविन पुला शेजारी धोढानी ओढ्याजवळ  हल्ला  केला या हल्ल्यात शेळी मृत  झाली.संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी या मृत शेळीचा पंचनामा केला. किरपे परिसरात बिबट्याचा वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेल आहे.      

संजयनगर शेरे येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा .

Image
  संजयनगर शेरे येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा. कार्वे प्रतिनिधी :-   आजची मुलगी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे मग ते क्षेत्र  क्रीडा असो की राजकारण, घर असो वा उद्योग. सर्वच क्षेत्रात मुलींचा सहभाग  अग्रभागी आहे. यासाठी मुलींचा योग्य तो सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत  बचत गट पर्वतक सुशांत तोडकर यांनी व्यक्त केले.  संजयनगर (शेरे) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त  बालिकांचा सन्मान करणेत आला. यावेळी ते बोलत होते.गट प्रवर्तक  गट प्रेरिका सुरेखा करवले ग्रामपंचायत सदस्य पोपट मदने अशोक आडके, अशोक मस्के, सुनिल शिंगाडे, मोहनराव पाटील बचत सदस्या,सुगंधा पात्रे, जयश्री शिरतोडे, धनश्री पवार, अनिता नामदास,रंगुबाई कांबळे, अंबिका देढे व संतोष सातपुते उपस्थित होते.

मकर संक्रांतीचे औचित्य साधून मास्कचे वाटप.

Image
  मकर संक्रांतीचे औचित्य साधून  मास्कचे वाटप. सुहास जगताप यांच्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक. कराड : प्रतिनिधी समाज जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबवणारे नगरसेवक सुहास जगताप यांनी कोरोना महामारी बाबत जनजागृती व्हावी,  नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी यासाठी मकर संक्रातीचे निमित्त साधून घरोघरी जाऊन मास्क चे वाटप केले .त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. नुकतीच मकर संक्रात होऊन गेली यानिमित्ताने सर्वत्र तिळगुळ दिले जाते .मात्र सुहास जगताप यांनी कोरोना बाबत जनजागृती व्हावी, नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, मास्क वापरावेत यासाठी आकर्षक डबीतून तिळगुळसह दोन हजार मास्क चे घरोघरी जाऊन वाटप केले. सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या जगताप यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या स्व:खर्चातून सोमवार पेठेतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जुन्या काळातील रांजणाचा आकार देवून सोमवार पेठेत पाणपोई बसवण्यात आली आहे. जगताप यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम केले असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्व:खर्चाने शहरात आवश्यकतेनुसार सॅनिटाईज फवारणी केली आहे. नागरिकांना ...

आकाराम कांबळे यांचे निधन.

Image
  आकाराम कांबळे यांचे निधन. शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे. शाहू  आंबेडकर चळवळीतील क्रियाशील ,  बौद्ध धम्म प्रसारक आकाराम कांबळे , शिराळा नाटोली यांचे निधन. संविधान प्रतिष्ठान (महा.राज्य) संस्थापक अध्यक्ष बौद्धाचार्य डाॅ.संदीप कांबळे यांचे वडिल होत.  जलदानविधी रविवार दिनांक 23/01/2023 रोजी होणार आहे.