Posts

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे योग प्रशिक्षण उत्साहात साजरे.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे योग  प्रशिक्षण उत्साहात साजरे. उंडाळे - प्रतिनिधी. माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेबरोबरच  सुदृढ आरोग्यासाठी योग करणे ही सुध्दा माणसाची गरज बनली आहे असे प्रतिपादन योग प्रशिक्षक श्री महालिंग मुंढेकर यांनी केले. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे विसरून चालला आहे परंतु विद्यार्थ्यांना त्याच्या उज्वल भविष्यासाठी अभ्यासाबरोबर  आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी  एक दिवशीय योग प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी श्री महालिंग मुंढेकर यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रियंका आलेकरी यांनी केले तर आभार  दीप्ती पाटील यांनी मानले.

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे यशाची गुरुकिल्ली या विषयावरती व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे यशाची गुरुकिल्ली या विषयावरती व्याख्यान संपन्न.   उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासा अंतर्गत यशाची गुरुकिल्ली या विषयावर डॉ. स्वानंद कुलकर्णी प्राचार्य श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ      इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी घोगाव यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी यश म्हणजे काय ते सुरुवातीपासूनच कसे मिळवावे व ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी कसे प्रयत्न करावेत व त्या दिशेने कशी वाटचाल करावी किंवा सकारात्मक विचार हे किती महत्त्वाचे असतात याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचाऱ्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले व सूत्रसंचालन व आभार यांनी केले.

कोडोली मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

Image
  कोडोली मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न. कराड - प्रतिनिधी. कोडोली ता. कराड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित कोडोली शाखेचा प्रथम वर्धापन दिन मारुती मंदिर कोडोली ता. कराड येथे मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला. या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम  दोन दिवसा मध्ये पार पडला पहिल्या दिवशी सोमवारी  श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य दिव्य पालखी संपूर्ण कोडोली गावातून काढण्यात आली. यामध्ये गावातील महिला व  श्री स्वामी समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महानैवद्य आरती व दिंडोरी प्रणित  मार्गाविषयी मोफत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शुगर व बीपी तपासणी करण्यात आली. तसेच तज्ञ वैद्य यांचे मार्गदर्शन आणि विविध मानवी आजारावर मोफत मार्गदर्शन करण्यात आले होते.या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य डॉक्...

सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नेते जनार्दन यशवंत पाटील (काका) यांचे निधन.

Image
  सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नेते जनार्दन यशवंत पाटील (काका) यांचे  निधन. शिराळा - प्रतिनिधी.      सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नेते,वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती, राजाराम बापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन यशवंत पाटील (काका) यांचे सोमवारी दुपारी बेळगाव येथे निधन झाले. येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ वाजता कासेगाव (ता.वाळवा) येथील त्यांच्या गावातील वाड्यासमोर अंत्यदर्शना साठी ठेवण्यात येणार असून कृष्णा नदी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.        ते लोकनेते राजारामबापू पाटील यांचे पुतणे,माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांचे चुलत भाऊ,तर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,युवा नेते देवराज पाटील,जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील यांचे वडील होत. जनार्दनकाका पाटील यांनी तरुण वयातच सार्वजनिक जीवनास सुरुवात करून त्यांचे वडील माजी सरपंच,राजारामबापू सहका...

श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.

Image
 श्री. कोटेश्वर विद्यालय गोवे येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा. कराड प्रतिनिधी:- ( प्रविण पाटील) श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे येथे गणित दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात गणितीय रांगोळ्या, गणितीय मॉडेल्स, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  . यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षिस देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक गाडगीळ साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती . तसेचे संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव , सचिव तुकाराम आण्णा जाधव संचालक भुजंगराव जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले . तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील गणित शिक्षक श्री लक्ष्मण उबाळे सर व टकसाले सर,कदम मॅडम यांनी परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले तसेच कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती विभा साबळे मॅडम व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळ उपस्थित होते.

मालदन ग्रामपंचायत निवडणुकीत ना.शंभूराज देसाई प्रणित पॅनेलने २५ वर्षानंतर सत्तांतर करीत मोठा विजय मिळविला.

Image
  मालदन ग्रामपंचायत निवडणुकीत ना.शंभूराज देसाई प्रणित पॅनेलने २५ वर्षानंतर सत्तांतर करीत मोठा विजय मिळविला.   ढेबेवाडी   - प्रतिनिधी (सागर पाटील)   ढेबेवाडी विभागातील एक मोठी असणाऱ्या मालदन गावच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या गटाच्या पॅनलने राष्ट्रवादी प्रणित पॅनेलचा धुव्वा उडवित सरपंच पदासह आठ जगावर विजय मिळवून सत्तांतर घडविले. गीतांजली काळे या लोकनियुक्त सरपंच झाल्या. विजयासाठी ना.शंभूराज देसाई प्रणित पॅनेलचे प्रमुख जोतिराज काळे प्रा. यशवंत काळे दत्ता कारंडे प्रशांत घारगे सांभाजी काळे यांच्या बरोबर युवा नेते नितीन काळे यांनी कार्यकर्त्यांना बरोबर घेवून जीवाचे रान करीत मोठा विजय संपादन केला आणि विजयात सिंहाचा वाटा उचलत किंगमेगर ठरले.             मालदन ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आजपर्यंत त्यांची गावावर एकहाती सत्ता होती.गावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कै.मधुकर काळे गुरुजी यांची हुकमत चालत आली होती. त्यांच्या नंतर राष्ट्रवादीची पक्कड ढीली झाली असल्याचे दिसून येत आहे. जोतिराज काळ...

द. इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे येथील विद्यार्थ्यांचे यश.

Image
 द. इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे येथील विद्यार्थ्यांचे यश.  उंडाळे - प्रतिनिधी. द इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे येथील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय झालेल्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश.  या स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सदगुरु  गाडगे  महाराज  कॉलेज या  ठिकाणी  स्पर्धा पार पडल्या. यामध्ये उंडाळे येथील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय आणि जिल्हा साठी निवड करण्यात आली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे द इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका गीतांजली पाटील यांनी अभिनंदन केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर, मैदानी खेळाचे प्रशिक्षक पांडुरंग पाटील, शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .