मालदन ग्रामपंचायत निवडणुकीत ना.शंभूराज देसाई प्रणित पॅनेलने २५ वर्षानंतर सत्तांतर करीत मोठा विजय मिळविला.

 मालदन ग्रामपंचायत निवडणुकीत ना.शंभूराज देसाई प्रणित पॅनेलने २५ वर्षानंतर सत्तांतर करीत मोठा विजय मिळविला.

 ढेबेवाडी - प्रतिनिधी (सागर पाटील)  

ढेबेवाडी विभागातील एक मोठी असणाऱ्या मालदन गावच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या गटाच्या पॅनलने राष्ट्रवादी प्रणित पॅनेलचा धुव्वा उडवित सरपंच पदासह आठ जगावर विजय मिळवून सत्तांतर घडविले. गीतांजली काळे या लोकनियुक्त सरपंच झाल्या. विजयासाठी ना.शंभूराज देसाई प्रणित पॅनेलचे प्रमुख जोतिराज काळे प्रा. यशवंत काळे दत्ता कारंडे प्रशांत घारगे सांभाजी काळे यांच्या बरोबर युवा नेते नितीन काळे यांनी कार्यकर्त्यांना बरोबर घेवून जीवाचे रान करीत मोठा विजय संपादन केला आणि विजयात सिंहाचा वाटा उचलत किंगमेगर ठरले.

            मालदन ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आजपर्यंत त्यांची गावावर एकहाती सत्ता होती.गावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कै.मधुकर काळे गुरुजी यांची हुकमत चालत आली होती. त्यांच्या नंतर राष्ट्रवादीची पक्कड ढीली झाली असल्याचे दिसून येत आहे. जोतिराज काळे यांनी देसाई गट आवळताना नुकत्याच झालेल्या दोन्ही सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध करत आपला वरचष्मा ठेवला होता.ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना युवा नेते नितीन काळे यांची मोलाची साथ मिळाली. नितीन काळे यांनी तरुण कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी करीत चांगला बारकावा केला आणि विजयश्री खेचून आणली. याअगोदर ही नितीन काळे यांनी देसाई गटासाठी आपले योगदान देताना ग्रामपंचायत लढवलेली होती. विजयी भैवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे सरपंचपदी सौ. गीतांजली काळे, सदस्यपदी जोतिराज काळे, वैभव काळे, सागर गायकवाड, सुजाता काळे, कल्पना देसाई, मीना जाधव, ज्योती चव्हाण, हे बहुमताने विजयी झाले तर विरोधी भैरवदेव ग्रामविकास पॅनेलचे मारुती पाटील सुनंदा जाधव विजयी झाले.   

         विजयानंतर ना.शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत गावात जंगी मिरवणूक काढली. विजयी उमेदवार आणि पॅनेलचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अभिनंदन केले 

         आमचे नेते पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्यामुळे गावात अनेक विकासकामे झाली आहेत.यामुळेच आम्हाला विजय खेचता आला. आम्ही गावची उर्वरित सर्व विकास कामे मार्गी लावून गाव विकासाच्या बाबतीत आदर्श करू. आमचे पॅनेल प्रमुख जोतीराज काळे व गावच्या नवनिर्वाचित सरपंच काळे यांच्या नेतृत्वाखली गावाचा सर्वांगीण विकास करून मतदारांनी टाकलेला आमच्यावरील विश्वास सार्थ ठरवू.

                                                 युवा नेते नितीन काळे.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .