श्री. बाळसिद्ध विद्यालय,घोगाव ची विद्यार्थिनी निबंध लेखन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम.
श्री. बाळसिद्ध विद्यालय,घोगाव ची विद्यार्थिनी निबंध लेखन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम.
उंडाळे - प्रतिनीधी.
ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे श्री. बाळसिद्ध विद्यालय घोगाव या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.सोनल अशोक साळुंखे या विद्यार्थिनीने सातारा जिल्ह्यामध्ये निबंध स्पध्ये मध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ व सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मा.ता.का.सूर्यवंशी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे आधारवड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने प्रत्येक तालुक्यात विविध स्पर्धा होतात त्यामध्ये तालुकास्तरावरून श्री.बाळसिद्घ विद्यालय,घोगांव विद्यालयाची विद्यार्थीनी कु. सोनल अशोक साळुंखे ही कराड तालुक्यामध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली होती.२४ सप्टेंबर रोजी राष्ट्रभाषा भवन,बारावकर नगर सातारा येथे जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. यामध्ये श्री. बाळसिद्ध विद्यालय,घोगांव ची विद्यार्थिनी कु. सोनल अशोक साळुंखे हिचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. तसेच तालुकास्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आलेली विद्यार्थ्यांनी कु.तैसिन अब्बास मकानदार यांचा यशाबद्दल ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळेचे अध्यक्ष मा. अॅड.श्री. आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ यांनी त्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व कौतुक केले.या प्रसंगी स्वा. दादासाहेब उंडाळकर मध्य.व उच्च माध्य. विद्यालय उंडाळे चे प्राचार्य बी.आर. पाटील सर, पर्यवेक्षक जे.एस्.माळी. स्वा.सै. शामराव पाटील विद्यालय, मलकापूरचे प्राचार्य जीवन फुके ,श्री.बाळसिद्घ विद्यालय,घोगांव चे मुख्याध्यापक हणमंत सूर्यवंशी, हौसाई कराड चे मुख्याध्यापक अशोक कोठावळे,ज्योतिर्लिंग विद्या. जिंती मुख्याध्यापिका शोभाताई पवार,निनाईदेवी विद्या,तुळसण मुख्याध्यापक धनाजीराव जाधव,येवती विद्या.येवती मुख्याध्यापक हणमंत शेवाळे , माणकेश्वर विद्यालय गोटेवाडी मुख्याध्यापक एकनाथ मोरे, न्यू इंग्लिश स्कूल येनपे मुख्याध्यापक आर.बी.पाटील, कोणेगाव विद्यालय कोणेगावचे मुख्याध्यापक डी .के.पवार, लक्ष्मीदेवी विद्यालय, बामणवाडी चे मुख्याध्यापक यू पी जाधव, दि इंग्लिश मीडियम स्कूल उंडाळे प्राचार्य डी.एच.देसाई,कला वाणिज्य महाविद्यालय उंडाळेचे प्राचार्य जावेद शेख,मा.धनाजी पाटील,एस्.आर.पाटील,रविंद्र पाटील,संजय साळुंखे,विजय पवार,विजय धाईगडे,जयवंत काटेकर ,महादेव शेवाळे,गणेश साळुंखे,रुपाली महाडीक,भिमराव भोसले,महादेव शेवाळे,महादेव चव्हाण,तानाजी यादव,जहाँगिर नाईकवडी,भिमराव जाधव ,विकास शिंगाडे,किरण कुंभार,संदिप मोहिते,सूरेश धाईगडे,हणमंत चव्हाण,दादा गुजट्टी,तात्या काटेकर ,संजय पाटील, सुभाष धाईगडे प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका चंद्रलेखा सुतार,पुर्व प्राथमिक प्रमुख सुनिता मिस व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment