कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे यशाची गुरुकिल्ली या विषयावरती व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे यशाची गुरुकिल्ली या विषयावरती व्याख्यान संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासा अंतर्गत यशाची गुरुकिल्ली या विषयावर डॉ. स्वानंद कुलकर्णी प्राचार्य श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी घोगाव यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी यश म्हणजे काय ते सुरुवातीपासूनच कसे मिळवावे व ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी कसे प्रयत्न करावेत व त्या दिशेने कशी वाटचाल करावी किंवा सकारात्मक विचार हे किती महत्त्वाचे असतात याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचाऱ्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले व सूत्रसंचालन व आभार यांनी केले.

Comments
Post a Comment