कोडोली मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

 कोडोली मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न.





कराड - प्रतिनिधी.

कोडोली ता. कराड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित कोडोली शाखेचा प्रथम वर्धापन दिन मारुती मंदिर कोडोली ता. कराड येथे मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला. या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम  दोन दिवसा मध्ये पार पडला पहिल्या दिवशी सोमवारी  श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य दिव्य पालखी संपूर्ण कोडोली गावातून काढण्यात आली. यामध्ये गावातील महिला व  श्री स्वामी समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महानैवद्य आरती व दिंडोरी प्रणित  मार्गाविषयी मोफत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शुगर व बीपी तपासणी करण्यात आली. तसेच तज्ञ वैद्य यांचे मार्गदर्शन आणि विविध मानवी आजारावर मोफत मार्गदर्शन करण्यात आले होते.या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य डॉक्टर आरती पाटील यांचे लाभले होते. आरोग्य शिबिरास कोडोली गावातील नागरिकांनी उस्फृत सहभाग नोंदवला दुपारच्या वेळेत प्रश्न उत्तर कार्यक्रम अंतर्गत विवाह, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, नोकरी, शेती अशा कौटुंबिक समस्यावर वैयक्तिक विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मार्फत प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महानैवद्य  आरती संपन्न झाली. अशा प्रकारे मोठ्या भक्ती भावात  संपूर्ण कार्यक्रमाची सांगता समारोप कोडोली नगरी पार पडला.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .