कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.

 कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव  या महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी  राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत यश संपादन केले.

जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी राधानगरी येथे झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी अनुजा कुंभार व अक्षदा बेंगडे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला.

या विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम व प्रियांका आलेकरी मॅडम  यांनी  केले.

तसेच टी-शर्ट पेंटिंग व प्रश्नमंजुच्या स्पर्धेमध्ये पूर्वा पवार, सानिका कदम, मानसी पाळसांडे व निशा धाष्टे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसुन जोहरी सर, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .