श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.
श्री. कोटेश्वर विद्यालय गोवे येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.
कराड प्रतिनिधी:- ( प्रविण पाटील)
श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे येथे गणित दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात गणितीय रांगोळ्या, गणितीय मॉडेल्स, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षिस देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक गाडगीळ साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती . तसेचे संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव , सचिव तुकाराम आण्णा जाधव संचालक भुजंगराव जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले . तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील गणित शिक्षक श्री लक्ष्मण उबाळे सर व टकसाले सर,कदम मॅडम यांनी परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले तसेच कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती विभा साबळे मॅडम व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळ उपस्थित होते.



Comments
Post a Comment