डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.
कराड - प्रतिनिधी.
समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी साप्ता. कराड वार्ताचे संपादक ईलाही मुल्ला म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय समाजाला समतेची वाट दाखवणारे महापुरुष होते. त्यांनी गुलामगिरीची साखळी तोडून सर्वांना मुक्त केले. शिका,संघटित व्हा, आणि संघर्ष करा असा संदेश दिला.
त्या प्रसंगी धनाजी मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ग्रंथालयाने वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य केले त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमास मा. विवेकानंद मुळे, संदीप शेळके, सीमा कांबळे, ग्रंथालयाचे वाचक, सभासद उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मानले.

Comments
Post a Comment