Posts

Showing posts from May, 2022

सहकार महर्षी जिजाबा अण्णा यांचे कार्य समाजाला आदर्श व प्रेरणादायी.

Image
  सहकार महर्षी जिजाबा अण्णा यांचे कार्य समाजाला आदर्श निर्माण करणारे व प्रेरणादायी आहे --प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील. लिंब ता. 26 -सहकार महर्षी जिजाबा अण्णांचे कार्य समाजाला आदर्श निर्माण करणारे व प्रेरणादायी आहे, असे मत शिव व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी मांडले. ते गोवे येथील सहकार महर्षी जिजाबा अण्णा जाधव स्मृतिदिनानिमित्त शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले, वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक आयुष्य ,वैयक्तिक मत या सगळ्यांना बाजूला सारून समाजहित व राष्ट्रहित यासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करणारी मांदियाळी या मातीत जन्माला आली. या मातीच्या परंपरेचे पाईक म्हणून जिजाबा अण्णांचा उल्लेख करावा लागेल. माणसाच्या यशाची व्याख्या तरी काय आहे? आपण किती उंचीवर पोहोचलो? यावर आपलं यश ठरत नाही ,तर आपण किती जणांना त्या उंचीवर घेऊन आलो यावर आपले यश ठरते .सहकार महर्षी जिजाबा अण्णा यांची शाळा उभारणीतील काम, त्यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, उभे केलेले समाजकारण व राजकीय पातळीवर केलेले काम आज साक्षी ठरत आहे हा आदर्श आपल्यापुढे आहे आपण त्यांचे वारसदार आहोत हा अभिमानाचा विषय आहे. आज आ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगावं येथे वेबिनार संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगावं येथे वेबिनार संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा  शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे गुड मॅन्युफॅक्चरिंग इन फार्मा अँड बायोटेक इंडस्ट्री या विषयावर  कीर्ती आफळे (फाउंडर डिरेक्टर क्यू ई डी जी ई कन्सल्टन्सी अँड ट्रेनिंग) यांचे वेबिनार नुकतेच पार पडले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून जी. एम .पी.म्हणजे काय व ते फार्मची विभागामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच ते या विभागांमध्ये कसे पार पडले जाते त्याच्या प्रोसेस व प्रॉडक्टस कसे बनतात हे त्यांनी उत्तम रित्या पटउन सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी कीर्ती आफळे मॅडम यांचे स्वागत केले. तर सूत्रसंचालन व आभार दीप्ती पाटील मॅडम यांनी मानले.

दत्तात्रय जंगम यांचे निधन.

Image
  दत्तात्रय जंगम यांचे निधन.   कराड  दि. 24 : ओगलेवाडी, ता. कराड येथील ज्येष्ठ पत्रकार व सदाशिवगड मराठी पत्रकार संघाचे सदस्य दत्तात्रय राजाराम जंगम (वय 72) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांनी विविध  दैनिकांमध्ये वार्ताहर म्हणून काम केले होते. तसेच त्यांनी विविध विषयावर लेख व कविता लिहिल्या होत्या. त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा माती सावडण्याचा विधी दि. 25 मे रोजी ओगलेवाडी येथील स्मशानभूमीत 8.30 वाजता होणार आहे.

प्रहारच्या आंदोलकांचा कोल्हापूर नाक्यावर रास्तारोको.

Image
  प्रहारच्या आंदोलकांचा कोल्हापूर नाक्यावर रास्तारोको. आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. रस्ता रोको प्रसंगी अजितराव बानगुडे, सचिन नलवडे, जावेद नायकवडी, भानुदास डाईंगडे, शिवाजी चव्हाण  यांना अटक. कराड - प्रतिनिधी. येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दुर कराव्यात या मागणीसाठी प्रहार संघटनेचे मनोज माळी गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रहारसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंंगळवारी कोल्हापूर नाक्यावर शहरातून बाहेर येणारा रस्ता अडवत रास्तारोको केला. वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.      कराड, पाटणसह कडेगाव तालुक्यातील गोरगरीब रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ, डॉक्टर, कर्मचारी आदी पदे रिक्त आहेत तर आरोग्य सेवेच्या अनेक गैरसोयी आहेत. याबाबत मनोज माळी पाच वर्षांंपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनासह मंत्री, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे रूग्णालयाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. ही दुरावस्था ...

कराड कोल्हापूर नाका येथे प्रहार संघटना व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्तारोको.

Image
  कराड कोल्हापूर नाका येथे प्रहार संघटना व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्तारोको. कराड - प्रतिनिधी. कराड येथे उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी बाबत गेल्या चार दिवसापासून प्रहार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण चालू आहे परंतु चार दिवस उपोषण करून ही मागण्या मान्य न झाल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कराड येथील कोल्हापूर नाक्यावरती प्रहार व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे-धनंजय मुंडे.

Image
  जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे-धनंजय मुंडे. ' कायद्याचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्यासाठी लवकरच कृती आराखडा.' पुणे / प्रतिनिधी :-  जादूटोणाविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून अंधश्रद्धा, अफवा व त्यामधून घडणाऱ्या कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी या कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी स्थापन केलेल्या समितीच्या माध्यमातून व्यापक प्रयत्नांची गरज असून त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीच्यावतीने पुणे येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेच्या दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आलेल्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके, भारत केंद...

पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट .

Image
  पुस्तकाचं गाव भिलारला  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट.   सातारा दि. 7 :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली. भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल  कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखविण्यात आला.   प्रशांत भिलारे यांच्या मंगलतारा या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले शिवकालीन इतिहासावर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहे. येथेही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार सुषमा पाटील तसेच भिलार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

वाहतूक पोलीस पूजा पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी .

Image
  वाहतूक  पोलीस पूजा पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी . अपघातग्रस्त वृद्धाला केलं हॉस्पिटलमध्ये दाखल. कराड- प्रतिनिधी,  येथील विजय दिवस चौक येथे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कृष्णा रघुनाथ रासकर (वय 57) रा. विद्यानगर सैदापुर यांचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जखम होऊन रक्त स्त्राव होऊ लागला. दरम्यान सदरची बाब तेथे कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला वाहतूक पोलिस पूजा पाटील यांच्या निदर्शनास आली. पूजा पाटील यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा वृद्धच्या डोक्यातून जास्त रक्तश्राव होत असल्याचे पूजा पाटील यांनी पाहिले. त्यांनी अँब्युलन्सची वाट न पहाता रासकर यांना तात्काळ रिक्षा तून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मलकापूर येथील कृष्णा हाॅस्पिटल येथे नेण्यात आले. त्यांची अपघातग्रस्त गाडी ट्राॅफीक कार्यालय  येथे लावन्यात आली असून पूजा पाटील यांनी वृद्धच्या नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. सध्या रासकर यांची प्रकृती स्थिर आहे. वाहतूक पोलीस पूजा पाटील या कर्तव्यावर असताना अपघात...

तब्येत खालावल्याने भानुदास डाईंगडे रूग्णालयात.

Image
  तब्येत खालावल्याने भानुदास डाईंगडे रूग्णालयात. 'उपजिल्हा रूग्णालय आंदोलनाला समाजातुन उत्सफुर्त पाठिंबा.'  " चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच."    कराड - प्रतिनिधी. उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयी दुर कराव्यात या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी सुरू केलेले उपोषण रविवारी चौथ्या दिवशीही सुरूच हाते. उपोषणकर्ते भानुदास डाईंगडे यांची तब्येत खालावल्याने रविवारी दुपारी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रूग्णालय हा गोरगरीब व सर्व सामान्य रूग्णांच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्याने समाजातील विविध स्तरातुन प्रहारच्या आंदोलनास उत्सफुर्त पाठिंबा मिळत आहे.      कराडच्या सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांची पदे भरावीत, एमआरआय मशिन, सिटीस्कॅन मशिन व तज्ञ उपलब्ध करावेत, रेडीओलॉजिस्ट उपलब्ध करावा, ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, 200 बेडचे रूग्णालय मंजुर करावे, डायलेसीस स्टाफ व वर्ग 4 ची पदे भरावीत आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी गुरूवारपासुन उपजिल्हा रूग...

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त सहकार ,पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन.

Image
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती  शताब्दी निमित्त सहकार ,पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी १०० सेकंद स्तब्ध उभे  राहुन केले अभिवादन.   सातारा दि. 6 : राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दी निमित्त राज्याचे सहकार ,पणन  तथा पालकमंत्री   बाळासाहेब पाटील यांनी   कराड येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर १००  सेकंद स्तब्ध उभे राहुन अभिवादन केले.     याप्रसंगी शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे,   प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव,  शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील म्हणाले, समाजातील सर्व घटकांना दिशा देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करून जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच समाजकारण आणि प्रशासन यांच्...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची किल्ले प्रतापगडाला भेट.

Image
  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांची किल्ले प्रतापगडाला भेट. सातारा दि. 5 :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज किल्ले प्रतापगडला भेट देऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला.यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन मनोभावी पुजा केली. यानंतर त्यांनी किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी  उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील व स्थानिक    नागरिक उपस्थित होते.यावेळी किल्ले प्रतापगड येथील ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे   स्वागत केले.शिवकालीन खेडेगाव व हस्तकला केंद्रास राज्यपालांची भेट दिली प्रतापगड माची येथील शिवकालीन खेडेगाव व हस्तकला केंद्रास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली.शिवकालीन खेडेगावाला भेट देवून शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष अनुभुती मिळाली. हे स्थळ प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वीर सैनिकांना अभिवादन अशा भावना त्यांनी या भेटी प्रसंगी व्यक्त केल्या.

उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयींबाबत मनोज माळी यांचे अमरण उपोषण.

Image
  उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयींबाबत मनोज माळी यांचे अमरण उपोषण. कराड - प्रतिनिधी. कराड, पाटण व कडेगाव तालूक्यातील गोरगरीब रूग्णांच्या दृष्टीने अत्यंत महात्वाच्या असलेल्या कराडच्या उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयी दुर कराव्यात यासाठी 5 ते 6 वर्षांपासुन पाठपुरावा करूनही गैरसोयी दुर होत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी गुरूवार पासुन उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशव्दारासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत दिलेल्या निवेदना म्हटले आहे. की, उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांची पदे भरावीत, एम,आर,आय. मशिन, सिटीस्कॅन मशिन व तज्ञ उपलब्द करावेत, रेडीओलॉजीस्ट उपलब्द करावा, ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, 200 बेडचे रूग्णालय मंजुर करावे, डायलेसीस स्टाफ व वर्ग 4 ची पदे भरावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहे. यासाठी नोहेंबर 2017 मध्ये 4 दिवस उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन पुणे विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्व मागण्याची पुर्तता करण्याचे लेखी अश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.  मात्र यानंतर चार ते पाच...

ऊस वाहतुकीसाठी सीएनजी वापरावर भर देणार : डॉ. सुरेश भोसले.

Image
  ऊस वाहतुकीसाठी सीएनजी वापरावर भर देणार : डॉ. सुरेश भोसले. ‘कृष्णा’चे १३ लाख ३८ हजार मे. टन गाळप; गळीत हंगामाची सांगता. शिवनगर, ता. 02 : ऊस वाहतुकीसाठी लागणाऱ्या डिझेलऐवजी सीएनजी गॅसचा वापराकडे एक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. कृष्णा कारखान्याकडून येत्या काळात सीएनजीच्या वापरावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या ६२ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.   प्रारंभी संचालक लिंबाजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कविता  पाटील यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी व्हा.चेअरमन जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, माजी प स सदस्य संजय पवार, जयसिंग माने, किरण थोरात, रेठरे...

वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा. शिराळा - प्रतिनिधी.        भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी  सागांवचे वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (कला) सागांव मध्ये रविवार दिनांक १ में  हा दिवस महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाच्या प्रांगणामध्ये  विद्यालयाचे   शिक्षकेत्तर कर्मचारी मा.श्री. सदाशिव  श्रीपती कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंगवले सर यांनी केले.  कार्यक्रमानंतर मा.मुख्याध्यापक सदावर्ते सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खालील मुद्दे मांडले. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपले छंद कशाप्रकारे जोपासावे ,वेळेचा सदुपयोग कसा करावा , अवांतर वाचन,लेखन करावे ,मुलींनी आईला घरकामात मदत करावी,आईकडून नवनवीन पदार्थ कसे बनवावे हे शिकून घ्यावे, प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतः चा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित करावे. या प्रसंगी विद्यालयाचे  मुख्...