वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.

 वारणा विद्यालय व ज्युनिअर काँलेज, सागाव मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.

शिराळा - प्रतिनिधी.

       भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी  सागांवचे वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (कला) सागांव मध्ये रविवार दिनांक १ में  हा दिवस महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाच्या प्रांगणामध्ये  विद्यालयाचे   शिक्षकेत्तर कर्मचारी मा.श्री. सदाशिव  श्रीपती कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंगवले सर यांनी केले.  कार्यक्रमानंतर मा.मुख्याध्यापक सदावर्ते सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खालील मुद्दे मांडले. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपले छंद कशाप्रकारे जोपासावे ,वेळेचा सदुपयोग कसा करावा , अवांतर वाचन,लेखन करावे ,मुलींनी आईला घरकामात मदत करावी,आईकडून नवनवीन पदार्थ कसे बनवावे हे शिकून घ्यावे, प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतः चा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित करावे.

या प्रसंगी विद्यालयाचे  मुख्याध्यापक  ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी ,शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .