वाहतूक पोलीस पूजा पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी .

 

वाहतूक  पोलीस पूजा पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी .

अपघातग्रस्त वृद्धाला केलं हॉस्पिटलमध्ये दाखल.



कराड- प्रतिनिधी,

 येथील विजय दिवस चौक येथे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कृष्णा रघुनाथ रासकर (वय 57) रा. विद्यानगर सैदापुर यांचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जखम होऊन रक्त स्त्राव होऊ लागला. दरम्यान सदरची बाब तेथे कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला वाहतूक पोलिस पूजा पाटील यांच्या निदर्शनास आली. पूजा पाटील यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा वृद्धच्या डोक्यातून जास्त रक्तश्राव होत असल्याचे पूजा पाटील यांनी पाहिले. त्यांनी अँब्युलन्सची वाट न पहाता रासकर यांना तात्काळ रिक्षा तून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मलकापूर येथील कृष्णा हाॅस्पिटल येथे नेण्यात आले. त्यांची अपघातग्रस्त गाडी ट्राॅफीक कार्यालय  येथे लावन्यात आली असून पूजा पाटील यांनी वृद्धच्या नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. सध्या रासकर यांची प्रकृती स्थिर आहे. वाहतूक पोलीस पूजा पाटील या कर्तव्यावर असताना अपघातग्रस्त वृद्धाला तात्काळ मदत मिळवून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी त्याच्या सोबत होमगार्ड सागर पावणे यांनीही मदत केली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .