Posts

Showing posts from February, 2023

अरविंद पाटील यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार.

Image
अरविंद पाटील यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार. कराड - प्रतिनिधी. सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघाच्या वतीने यावर्षीचा आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार  2023 आय.एस.ओ मानांकन प्राप्त कराड नगरपरिषद शाळा क्रं 9 चे मुख्याध्यापक  व साळशिरंबे गावचे सुपुञ मा.श्री. अरविंद पाटील  यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ ,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे होते . श्री.अरविंद पाटील यांनी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामकाज बद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

बाबुराव पाटील यांचे निधन.

Image
  बाबुराव पाटील यांचे निधन. उंडाळे -  प्रतिनिधी. उंडाळे गावचे सुपुत्र माजी  आरोग्य सहाय्यक बाबुराव पाटील यांचे निधन ऊंडाळे  ता. कराड येथील बाबुराव कृष्णा पाटील यांचे वयाच्या 74 व्या वर्षी शनिवार दिनांक 25 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,दोन मुली ,सुना नातवंडे  असा परिवार आहे .डॉ .विकास पाटील यांचे ते  वडील होते .अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे संघटक ज्ञानेश्वर शेवाळे  यांचे ते  मामा होते .रक्षाविसर्जन सोमवार दि.२७ रोजी सकाळी ९.३० वा ऊंडाळे  येथे होणार आहे .

कोडोलीतील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत यश.

Image
  कोडोलीतील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत यश. कार्वे प्रतिनिधी :- कोडोली ता.कराड येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशालेतील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी एन.एम.एम.एस (NMMS) परीक्षेत विद्यालयाच्या आठ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणे 1) चि. राज यशवंत जगताप 99  2) कु.सानवी संदीप जगताप 99  3) कु.श्रावणी सुखदेव जगताप 96  4) कु.तनुजा कुंडलिक मोरे 91 5)  कु.अक्षरा हनुमंत घाडगे 83 6)  चि. श्रीकांत अरुण मदने 78 7) कु. आरती नागेश जगताप 75 8) कु.आरती उत्तम पाटील 73  या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक श्री. मोरे आय.जे. श्री.आंबी एस.ए.सौ. जाधव व्ही.ए.सौ.संदे एस. ए. यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री तरवारे के.पी. यांनी अभिनंदन केले.तसेच  या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक कोडोली गावातील ग्राम...

कोडोली हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Image
  कोडोली हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न. कार्वे प्रतिनिधी :-  कोडोली ता. कराड येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाले मध्ये वार्षिक पारितोषिक व विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी विठ्ठल पाटील होते .तर प्रमुख पाहुणे ए. एस साळुंखे सर माजी मुख्याध्यापक यशवंत हायस्कूल कराड हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम भारती विद्यापीठचे संस्थापक डॉ.पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. तसेच प्रशालेतील इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक आय.जे.मोरे सरांनी भारतीय  विद्यापीठाचे गौरव गीताचे गायन केले. या कार्यक्रम प्रसंगी विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व शालेय उपयोगी भेट वस्तू देऊन  सन्मानित करण्यात आले.           तसेच विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध देशभक्तीपर गीते,नाटीका,नृत्य,हास्...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं येथे इंडक्शन प्रोग्राम संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं येथे इंडक्शन प्रोग्राम  संपन्न. उंडाळे- प्रतिनिधी.  श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना फार्मसी म्हणजे काय तसेच फार्मसीच्या परीक्षेचे स्वरूप काय असते, विषय कोणते कोणते असतात व फार्मसी नंतर कुठल्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आहेत व आपल्या पाल्याची प्रगती काय आहे हे समजावे यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी डिप्लोमा प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना फार्मसी बद्दल सविस्तर माहिती दिली तसेच संस्थेचे ध्येय, उद्दिष्टे समजावून सांगितली. त्याचबरोबर पालकांच्या शंकांचे निरसन देखील केले. त्याचबरोबर प्रथम वर्षातील इंडक्शन प्रोग्राम देखील पार पडला यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या पाटील मॅडम यांनी महाविद्यालयातील प्रॅक्टिकल लॅब, क्लासेस मशीन...

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगावं येथे व्याख्यान संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मूल्य व पर्यावरणाचे संवर्धन व्यक्तिमत्व विकास यावरती व्याख्यान पार पडले. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्या शिक्षणाची खरे महत्त्व काय व ते कधी सिद्ध होते तसेच शिक्षण घेतले आहे तर त्याबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक, आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच कायद्यानुसार आपण व्यक्ती म्हणून कसे असले पाहिजे पर्यावरणाचे संवर्धन कसे केले पाहिजे हे या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शिवाजी नेर्ली यांनी सांगितले. या कार्यक्रमा वेळी संस्थेच्या वतीने मा. प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी नेर्ली यांचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोनिका चवरे यांनी केले तर आभार प्रा. श्रद्धा वैद्य यांनी मानले.

द. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

Image
  द.   बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न. शिराळा - प्रतिनिधी.       आरळा ता.शिराळा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या शिराळा तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. शिराळा तालुक्यामध्ये धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने कार्यक्रमाची आखणी तयार केलेली आहे.  उन्हाळी सुट्टीमध्ये भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमाचे नियोजन केले असून शिराळा तालुक्यातील बौद्ध बंधू भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावयाचा आहे.    धम्म वाढीसाठी लागणारे कार्यक्रम शिराळा तालुक्यात जोमाने राबवणे त्याकरिता येत्या गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी शिराळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन धम्म बांधवांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत या बैठकीसाठी जगन्नाथ परुले , एम एच परुले , जगन्नाथ झाडे , बुधाजी झाडे , सुरेश कांबळे , डॉ. विनोद झाडे , डॉ.संदीप कांबळे , प्रदीप बनसोडे रोहित वाघमारे ,ज्ञानू कांबळे , शशिकांत कांबळे , दीपक कांबळे रमा...

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाची संस्थांतर्गत पथक तपासणी.

Image
  शिक्षकांनी अद्ययावत अध्यापनकौशल्ये आत्मसात करावीत : डॉ. अनिल पाटील. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाची संस्थांतर्गत पथक तपासणी. कराड : प्रतिनिधी.  शैक्षणिक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळेच नॅकच्या धर्तीवर आता उच्च माध्यमिक स्तरावर शाळासिद्धी मूल्यांकन सुरू असून, त्या पद्धतीने महावि़द्यालयांचे मूल्यमापन केले जात आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेत शिक्षकांनी अद्ययावत अध्यापनकौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन इचलकरंजी येथील डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. ते कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात संस्थांतर्गत पथक तपासणी आणि शाळासिद्धी मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. 30) आयोजित सहविचार सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड उपस्थित होते.    डॉ. पाटील पुढे म्हणाले, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय हे शैक्षणिक संकुल नयनरम्य, प्रसन्न आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे.  दूरदृष्टी लाभलेले व अष्टपैलू प्राचार्य डॉ.महेश गायकवाड यांच्यामुळे...